
नागपूर: सप्तक नागपूरतर्फे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेला अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘किस्से फिल्मी नगमों के – भाग सात’ रविवार, 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कवि कुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्टंट सिस्टिम, गायत्री नगर, नागपूर येथे हा कार्यक्रम होईल.
डॉ. सुधीर भावे मागील सात वर्षांपासून वेगवेगळे चित्रपटांचे विषय घेऊन हा कार्यक्रम प्रस्तुत करीत असतात. यावर्षीचा विषय हा फिल्मी गीतकार आणि शायर यांच्यावर आधारित असून त्यांच्या संदर्भातील गप्पांसोबत गाण्यांची मेजवानी नागपूरकरांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीकांत मुकेवार उपस्थित राहणार आहेत. गायक कलाकार डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर, डॉ. सुरेश अय्यर आणि ईशा रानडे विविध गीते प्रस्तुत करतील. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद मास्टे यांचे आहे.
कार्यक्रमाला परसिस्टंट कंपनीचे सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम केवळ सप्तक सदस्य आणि खास निमंत्रितांसाठीच असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.









