नागपूर:नागपुरात खुनाचे सत्र सुरूच असून, प्रेमप्रकरणातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची घटना गुरुवारी वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. रवी सावा (२६, रा. इंदोरा) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेतील आवेश मिर्झा बेग, कुणाल खडतकर आणि आयुष पेठे या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनूसार ,गुरुवारी सकाळी पांढुर्णा गावच्या पोलिस पाटील यांना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची तपासणी केली असता तरुणाच्या खिशात एक मोबाईल आढळून आला ज्यामध्ये रवी साओ असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
तपासादरम्यान मृत तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणी आरोपी आवेशशी बोलू लागली होती. त्यामुळे रवी आणि आरोपी आवेश यांच्यात अनेक वाद झाले. बुधवारी रवीने आवेशला फोन करून भेटण्यास सांगितले. आरोपी त्याच्या दोन मित्रांसह भेटायला आला होता. यावेळी आरोपीचे दोन मित्रही उपस्थित होते. आरोपींनी रवीला गाडीत बसवून आऊटर रिंगरोडच्या दिशेने नेले.
दरम्यान, आरोपींनी चाकूने रवीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्यावर 25 हून अधिक वार केले.त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी मृतदेह पांढुर्णा गावात फेकून पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.