Published On : Wed, Apr 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘निष्ठेला लाथ, नवख्यांना साथ’; नागपूर काँग्रेसमध्ये स्फोट, कमलेश समर्थांचा राजीनामा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या घोषणेनंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अनेक वर्षे पक्षाशी निष्ठा राखून काम करणारे ज्येष्ठ नेते कमलेश समर्थ यांनी अखेर संताप व्यक्त करत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे शहरातील काँग्रेस संघटनेत मोठी हलचल निर्माण झाली आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी पक्षाने केतन ठाकरे आणि अतुल कोटेजा यांची नावे जाहीर केली आहेत. केतन ठाकरे हे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र असल्याने त्यांच्या निवडीवर पक्षात चर्चा रंगली आहे. निवडणुकीचा अनुभव नसतानाही त्यांना संधी मिळाल्याने अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, कमलेश समर्थ यांनी प्रभाग क्रमांक २० मधून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. हा काँग्रेसचा बळकट प्रभाग मानला जातो. मात्र, त्यावेळी त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर समर्थ यांना स्वीकृत सदस्यत्व देण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगितले जात होते. परंतु अंतिम यादीत त्यांचा समावेश न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आपल्या राजीनामा पत्रातून समर्थ यांनी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे. जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, ज्यांना पदे देण्यात आली आहेत, त्यांनी आपल्या मतदारसंघात पक्षासाठी किती मते मिळवली याचा आढावा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement

कमलेश समर्थ यांचा राजकीय प्रवास दीर्घकाळाचा असून त्यांनी युवक काँग्रेसपासून विविध पदांवर काम केले आहे. शहर काँग्रेसमध्ये महासचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम करत पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे.

या घडामोडींमुळे नागपूर काँग्रेसमध्ये असंतोष अधिक तीव्र झाला असून, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews #AntiGundaSquad #crimenews

अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi #MaharashtraNews

गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan #MaharashtraNews

मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC #CrimeNews

नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges