Published On : Sun, Dec 19th, 2021
By Nagpur Today Nagpur News

कविसंमेलनाने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिसरा दिवस गाजवला

Advertisement

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्‍या तिस-या दिवशी ‘कविसंमेलन’ आयोजित करण्‍यात आले होते. हास्‍य, वीरतेच्‍या, प्रेमकविता आणि राजकीय कवितांनी महोत्‍सवाचा तिसरा दिवस चांगलाच गाजला.
कविसंमेलनाला नितीन गडकरी यांच्‍यासह शिक्षक आमदार नागो गाणार, नवभारतचे समूह संपादक निमेश माहेश्‍वरी, दै. भास्‍करचे समूह संपादक प्रकाश दुबे, महाराष्‍ट्र टाईम्‍स श्रीपाद अपराजित, पुण्‍यनगरीचे संपादक रमेश कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. पिनाक दंदे, सिम्‍सचे संचालक लोकेंद्र सिंग, निको ग्रुपचे संचालक रमेश जयस्‍वाल यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

कविसंमेलनात कवी कुमार विश्‍वास, शिखा दिप्‍ती, विनीत चौहान, शंभू शिखर यांनी सहभाग नोंदवला. संपूर्ण कविसंमेलनावर राजकारण, विरता, प्रेमकवितांचा प्रभाव राहिला. डॉ. कुमार विश्‍वास यांनी कविसंमेलनाचे सूत्र स्‍वीकारताना सध्‍या उत्‍तरप्रदेश फारच व्‍यस्‍त राज्‍य असल्‍याचे सांगितले तेव्‍हा हास्‍याची लकेर उमटली.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शंभू शिखर यांनी आपल्‍या राजकीय व्‍यंग कवितांनी मोठ्या संख्‍येने टाळ्या घेतल्‍या. जाता जाता त्‍यांनी एक सल्‍ला दिला. ते म्‍हणाले,
लालू से मिलो वो तुम्‍हे बिहारी ना कर दे,
जनता तुम्‍हे यहा का भिकारी ना बनादे,
जोगी जी तुम्‍हे ट्रम्‍पसे तिवारी ना कर दे
विनीत चौहान यांनी विरतेची कविता सादर करीत नागपूरकरांच्‍या टाळ्या घेतल्‍या. ते म्‍हणाले,
ये धरती तानाजी के शिषदान की है
ये धरती सावरकर के प्राणदान की है
वीर मराठी पौरूष कभी झुका नही,
ये धरती छत्रपती के स्‍वाभिमान की है
प्रेम नगरी मथुरा वृंदावनमधून आलेल्‍या शिखा दिप्‍ती यांनी प्रेम कविता सादर केल्‍या. शायरी मेरी जिनकी जुबानी हुयी, जिनकी हात ये मिरा दिवानी हुयी सारख्‍या त्‍यांच्‍या कवितांना रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.

खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, रेणुका देशकर, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, अब्‍दुल कादीर व किशोर पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.

मराठी मावशीच्‍या घरी आलो

हिंदी माझी माता असून मराठी ही माझी मावशी आहे. मी सध्‍या मावशीच्‍या घरी आलेलो आहे. नागपूरचे लोक खूप शालिन आहे. नागपूर ज्‍यांना स्‍वीकारते त्‍यांना दिल्‍लीही स्‍वीकार करते, असे डॉ. कुमार विश्‍वास यांनी सांगितले. मुस्‍कुराती जिंदगानी चाहिए,
शब्‍द की जागृत कहानी चाहिए
सारी दुनिया अपनी हो जाती है
जब उसकी मेहेरबानी चाहिए
असे म्‍हणत कुमार विश्‍वास यांनी नागपूरकरांनी मने जिंकली.

20 डिसेंबर महोत्‍सवात

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात आज, 20 डिसेंबर काणेबुवा प्रतिष्‍ठानचा ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ या शास्‍त्रीय संगीताच्‍या कार्यक्रम. मंजुषा पाटील, सुयोग कुंडलकर, पं. विजय घाटे, शीतल कोलवाटकर, जिनो बँक्‍स, गिरीधर उडूपा, मिलिंद कुळकर्णी व सुरंजन खंडाळकर यांचा सहभाग.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement