Published On : Fri, Nov 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

खापरखेडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन देशी अग्निशस्त्रे जप्त!

Advertisement

नागपूर — खापरखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीनुसार धाड टाकत दोन युवकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या कडून दोन देशी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई अवैध शस्त्र पुरवठा साखळीवर मोठा आघात ठरली आहे.

पहिल्या आरोपीकडून ‘कट्टा’ जप्त-
दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी पहाटे खापरखेडा पोलीसांना खबर मिळाली की सुरज उर्फ मुसा वरणकर (वय २५, रा. चनकापुर वस्ती) हा परिसरात अवैध कट्ट्यासह फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ राबवलेल्या सापळ्यात त्याला पकडले. त्याच्याकडून सिल्वर रंगाचा देशी बनावटी कट्टा, किंमत अंदाजे २५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आला.

Gold Rate
21 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,22,500 /-
Gold 22 KT ₹ 1,13,900 /-
Silver/Kg ₹ 1,53,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेनंतर सुरजवर गुन्हा क्र. २७९/२५, कलम ३, ५, २५ भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यास अटक करण्यात आली.

शस्त्र पुरवठादार जग्गा यादवला अखेर अटक-
सुरजची चौकशी केली असता त्याने हे शस्त्र रवि उर्फ जग्गा यादव (वय २०, रा. कवडस) याच्याकडून घेतल्याचा खुलासा केला. घटना उघड झाल्यानंतर जग्गा उत्तर प्रदेशात पळून गेला होता.

पोलिसांनी त्याचा माग काढत असताना १९ नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली की तो पुन्हा कवडस परिसरात दिसून आला आहे.
पथकाने कारवाई करत त्याला पकडले. चौकशीदरम्यान त्याने संपूर्ण प्रकरणाची कबुली दिली, त्यानंतर २० नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे त्याला अटक करण्यात आली.

घरझडतीत आणखी एक माउझर हाती-
जग्गा यादवने कबुलीनंतर सांगितले की त्याच्या घरात अजून एक शस्त्र ठेवले आहे. पंचांच्या उपस्थितीत घरझडती घेतली असता देशी बनावटीचा काळ्या रंगाचा माउझर, किंमत अंदाजे ५० हजार रुपये, जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कारवाई-
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, उपआयुक्त संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिष रूमकर यांनी केले.

कारवाईत पथकातील.पोउपनि. विलास करंगामी,
पोहवा नामदेव टेकाम,पो.हवा मुकेश वाघाडे,महिला पो.हवा कविता गोंडाने,पो.शि. प्रितम ठाकूर,पो.शि. राजू भोयर,पो.शि. अमित खोब्रागडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

पोलिसांकडून शस्त्र पुरवठ्याचे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement