
मुंबई : बॉलिवूडचं ग्लॅमरस कपल कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी अखेर आनंदाचा क्षण उजाडला आहे. दोघं आता आई-बाबा झाले असून, त्यांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. या गोड बातमीने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
वयाच्या ४२व्या वर्षी कतरिनानं मातृत्वाचा आनंद लुटला असून, तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, “आमच्या आनंदाचं आगमन झालं आहे. अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय… 7 नोव्हेंबर 2025… कतरिना आणि विक्की.”
कतरिनाच्या प्रेग्नंसीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं विक्कीसोबत बेबी बंप फ्लॉन्ट करणारा फोटो शेअर करत आपली गर्भारपणाची बातमी जाहीर केली होती. सप्टेंबर महिन्यात या जोडप्यानं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत लवकरच होणार असल्याची घोषणा केली होती.
सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
विक्की-कतरिनाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारांनीही शुभेच्छांचा ओघ लावला आहे.
अभिनेता मनीष पॉल म्हणाले, “तुमच्या बाळाच्या आगमनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.”
रकुल प्रीत सिंह, हुमा कुरेशी, आणि अर्जुन कपूर यांनीही रेड हार्ट इमोजी शेअर करत या नव्या पालकांना शुभेच्छा दिल्या.
चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण या नव्या स्टार बेबीची झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. विक्की कौशल पहिल्यांदाच ‘बाबा’ बनल्याचा आनंद व्यक्त करत असून, बॉलिवूड जगतातही आनंदाचा माहोल आहे.










