नागपूर : कपिलनगर पोलिसांनी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून कारवाई करत एका व्यक्तीला देशी बनावटीच्या दोन अग्निशस्त्रांसह अटक केली आहे. ही कारवाई ३० जून २०२५ रोजी रात्री ७.५० ते ११.१५ या वेळेत उप्पलवाडी परिसरातील सहारे ले-आऊटजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल मधुकर साखरकर (वय ३०), रा. प्लॉट नं. ५१, तारकेश्वर नगर, नारी, असे आहे. आरोपीकडून एक काळ्या रंगाचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्तुल (किंमत अंदाजे ₹१५,०००/-) आणि एक देशी कट्टा (किंमत ₹१०,०००/-) असा एकूण ₹२५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पंचासमक्ष सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून कोणताही अधिकृत परवाना नसताना ही शस्त्रे बाळगली जात होती. फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करून पंचनामा करून शस्त्रं जप्त करण्यात आली.ही यशस्वी कारवाई झोन ५ चे मा. निकेतन कदम सर आणि मा. एबल जरीपटका सर यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलनगर पोलीस पथकाने पार पाडली.