Published On : Tue, May 7th, 2019

कन्हान ला घरासामोरून चारचाकी कार च्या चाके चोरीचा धुमाकूळ

सात कारच्या १७ चाकाची चोरी , १०९ व्या दिवसी दुसऱ्यादा एकाच कारच्या चाकाची चोरी

कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान कांद्री शहरातील लोकांच्या घरा सामोरून मध्य रात्री चारचाकी कारचे चाके चोरीचा अञात चोरांनी धुमाकूळ घातला असुन एक महिना १० दिवसांनी म्हणजे १०९ व्या दिवसी दुसऱ्यादा एकाच कारच्या चाकाची अञात चोरांनी चोरी केली.

गणेश नगर येथील राजेश खोरे यांच्या घरासामोरून दि २६/०१/२०१९ च्या मध्य रात्री नविन कार क्र एम एच ४० बी जे २५७७ चे एका बाजुचे दोन चाके चोरून नेले होते. त्याच कारचे तीन महिने १० दिवसानी म्हणजे १०९ व्या दिवसी रविवार (दि.५) मे च्या मध्यरात्री दुसऱ्यादा दोन चाके अञात चोरांनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे

या अगोदर गणेश नगर येथील १) राजेश खोरे यांच्या घरासामोरून दि २६/०१/२०१९ च्या मध्य रात्री नविन कार क्र एम एच ४० बी जे २५७७ चे एका बाजुचे दोन चाके चोरून नेले होते. दोन दिवसानी (दि.२८) जानेवारी च्या मध्य रात्री हनुमान नगर येथील २) पांडे यांचे जावई मनिष राउत यांच्या कार चे दोन चाके अञात चोरांनी चोरून नेले. ३) गणेश नगर बुद्ध विहारा जवळील वाघमारे यांच्या कारचे दोन चाके चोरून नेले. ४) शिवनगर कन्हान येथील एका कारचे दोन चाके चोरून नेले. ५) वाघधरे वाडी कन्हान येथील बर्वे यांच्या कारचे चारही चाके चोरून नेले होते.६) संताजी नगर कांद्री येथील भोयर यांच्या कारचे एक चाक अञात चोरांनी चोरून नेले. ७) गुरुवार दि.०२/०५ /२०१९ ला रात्री पांधन रोड गणेश नगर कन्हान येथील दुधपचारे यांचे जावई यांच्या चारचाकी वाहन (कार) क्र एम एच ४० ए आर ७५८९ चे अञात चोरांनी दोन्ही चाके काढुन दगड लावुन चाके घेऊन पसार झाले. फिर्यादी किशोर कौलुके रा रामटेक हयानी कन्हान पोलीस स्टेशनला अञात चोरा विरूध्द तक्रार दाखल केली. चोर इतके शातीर आहे की कारचे चाके काढुन दगड लावुन कार जश्या च्या तशी उ़भी ठेवुन पसार होतात. यांच्या तक्रारी कन्हान पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या आहेत. चोरीच्या घटना दाखल करण्याकरिता पोलीसा कडुन टाळाटाळ करण्यात येत असल्या चे बोलल्या जात आहे. आता पर्यंत सात चारचाकी कारचे १७ चाके चोरी करून अञात चोरांनी शहरा त धुमाकूळ घातला असुन या चोरांना पकडण्यात कन्हान पोलीस अपयशी ठरत आहे.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कोळशा, रेती, मँग्निज दगड, विधृत तार, तांबे, लोंखड, ऑईल, डिझेल, शेतकऱ्या चे जनावरे, मोटार सायकल, कारच्या चाकाची चोरी मोठय़ा प्रमाणात होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची व त्यांच्या मालमत्तेची तसेच शासकीय मालमत्तेची सुरक्षा धोक्यात आली आहे. यास्तव वरिष्ठ अधिकारी हयानी विशेष लक्ष देउन या चोरटयांचा त्वरित बंदोबस्त लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.