Published On : Fri, Sep 27th, 2019

टेकाडी येथे हाथीमार चाकुसह युवकास अटक

कन्हान : – गरदेव चौक टेकाडी येथे हाथीमार चाकुसह कन्हान पोलीसांनी नितेश गिरी या युवकास अटक केली आहे .

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ संबंधाने संपुर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने मा. श्री. राकेश ओला, पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी नागपुर जिल्हयात निवडणु का निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी बेकायदेशीर व अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले असल्याने गुरुवार (दि.२६) ला प्राप्त माहीती नुसार टेकाडी येथील गरदेव चौकात नितेश राजकुमार गिरी वय २५ वर्ष रा. महाजन वाडी टेकाडी ता पारशिवनी जि नागपुर यास कन्हान पोलीसांनी हाथीमार चाकु सह ताब्यात घेऊन कलम ४/२५ सह कलम १३५ मुपोका नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.

ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शना त राजेंद्र पाली, राहुल रंगारी, संजय भदोरिया हयानी केली असुन पुढील तपास राहुल रंगारी करित आहे.