Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 22nd, 2019
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  कन्हान तारसा रोड ची दैना अवस्था

  मोठा अपघात झाल्यावर रस्त्याचे काम करणार का ?

  कन्हान: शहरातुन मोठय़ा प्रमाणात जड वाहतुक सुरू असल्याने तारसा रोड चौक कन्हान ते रेल्वे क्रॉसिंग तुकाराम नगर पर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने तारसा रोडची दैना अवस्था होऊन धुळीचे प्रदुषण व छोटय़ा वाहनाचे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने नविन सिमेंट रस्त्याचेकाम सुरू करण्यात आले परंतु मंदगतीने असल्याने व सरास जडवाहतुक मुळे जागोजागी मोठ मोठे खड्डे व धुळीच्या प्रदुषणाने ये-जा करण्या -यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन परिसरातील नागरिकांना भंयकर त्रास सहन करावा लागत आहे. कन्हान शहरातील मुख्य वर्दळीचा मधोमध असलेला तारसा रोड चौक ते रेल्वे क्रॉसिंग तुकाराम नगर पर्यंत च्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असुन भयंकर त्रास सहन करून कधी कधी अपघाताला बळी पडावे लागते. तुकाराम नगर येथे लागुन च रेल्वे माल वाहतुक यार्ड असल्याने रेल्वेनी आलेल्या खताचे ट्रक नी मोठय़ा प्रमाणात याच रस्त्याने शहरातुन वाहतुक सुरू आहे. तसेच बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांद्री टोल नाका वाचवि ण्याकरिता जड वाहतुक करणारे दहा चाकी व त्यापेक्षा जास्त चाकी वाहने याच रस्त्यावरून वाहतुक सुरू असल्या ने धुळीचे भंयकर प्रदुषण होऊन रस्त्या लगतच्या दुकानदार व परिसरातील नागरिकांना भंयकर त्रास सहन करावा लागतो. या जड वाहतुकीने तारसा रोड चौकात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनाच्या रांगा लागत असतात.

  कन्हान – तारसा – अरोली रा मा ३४५ रस्त्याचे ०/००० ते ०/२३६पर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम प्राकलन किंमत २०० लक्ष रूपयांचे भुमिपुजन २२ फेब्रुवारी २०१९ ला सीमेंट रस्त्याचे भुमीपुजन रामटेक विधान श्रेत्राचे आमदार मा. डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचा हस्ते उद्घाटन लोकसभेची निवडणुकीचा आचारसंहितेचा विचार करून करण्यात आले होते. मात्र निवडणूक संपून परीणाम घोषित करण्यात येईल. मात्र कन्हान तारसा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेख मध्ये सिमेंट रस्त्याचे काम खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले. त्यामुळे मोठ्या उत्साहात कंत्राटदार यानी पावसाळा लागण्याचा आधी रस्त्या चे काम पूर्ण करण्यासाठी जेसीबी लावून खोदकाम केले तसेच गिट्टी टाकुन रोलर फिरवण्यात आले. मात्र या रस्त्याचे काम दोन दिवस सुरू व पाच दिवस बंद राहुन काम कासवगतीने सुरू असून एक आठवडा होऊन गिट्टी टाकून हातावर हात ठेवून बसले आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी एका बाजूने खोदकाम केले आहे तर दुसर्‍या बाजूला मोटरसायकल हलके वाहनासाठी वाहतूक सुरू आहे. याच रस्त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय सुध्दा असुन बॉयपास चारपदरी महामार्गावरील कांद्री टोल नाका वाचविण्या करिता जड वाहतुक सरास सुरू असल्याने जागोजा गी मोठमोठे खड्डे व धुळीच्या प्रदुषणाने ये-जा करण्या-यांना जिव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत असुन परिसरातील नागरिकांना भंयकर त्रास सहन करावा लागत आहे. याच जड वाहतुकीने महाकाली काम्प्लेक्स व प्रभाग १ मध्ये जाणारी पाण्याची पाईप लाईन फुटुन हजारो लीटर पाणी वाया गेले. नागरीकात दबक्या सुरात चर्चेचा विषय आहे की काही स्थानिक राजकीय नेते स्वतःचा स्वार्थापोटी कंत्राटदारावर दबाव आणून जाणून बुजून वरच्या राजकीय नेत्याचे नाव पुढे करून काम थांबविण्यात येत आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या दबावाने नागरीकांची चिंता वाढलेली आहे. रोज तर अपघात होतात परंतु या रस्त्यावर मोठ्या अपघाताला निमंत्रण दिल्यावरच काम वेगाने पूर्ण करण्यात येईल का ? असा नागरीकांत रोष व्यकत होत आहे. येणा-या जून महिन्यात पाऊस सुरू होईल शिवाय शाळा पण याच महिन्यात सुरू होईल तेव्हा या पाऊसाचा महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना सुध्दा प्रश्न पडलेला आहे. यास्तव प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून कन्हान येथील तारसा रोड चौक ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नियमानुसार व नियमित करून लवकरात लवकर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  कन्हान-तारसा रोड सिमेंट रस्त्याचे काम बंद असल्याने रस्त्यावर उभ्या रोड रोलरवर ” हा रोडचा ठेकेदार लापता आहे. आपल्या जिवाची स्वतः काळजी घ्या. प्रशासन झोपले आहे . ” असे फलक लावुन रोष व्यकत करण्यात आले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145