Published On : Sat, Oct 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिव्यांग महिलांच्या हातांवर कांचनताई गडकरींनी रेखाटली मेहंदी; ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ उपक्रमाची सांगता

Advertisement

नगरसेविका निधी तेलगोटे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३७ मध्ये विशेष आयोजन

दिव्यांग महिलांच्या हातांवर कांचनताई गडकरींनी रेखाटली मेहंदी; ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ उपक्रमाची सांगता

नागपूर, ३१ ऑक्टोबर २०२६ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ या उपक्रमाची सांगता प्रभाग क्रमांक ३७ मधील टेलिकॉम नगर गार्डन येथे झाली. यावेळी सौ. कांचनताई नितीन गडकरी यांनी दिव्यांग महिलांच्या हातांवर स्वतः मेहंदी रेखाटून या उपक्रमाचा समारोप केला.

नागपूर महानगरपालिकेच्या विधी समिती सभापती तथा नगरसेविका निधी मिनाक्षी नितीन तेलगोटे यांच्या पुढाकारातून दिव्यांग महिलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कांचनताई गडकरी यांनी या उपक्रमामागील नितीन गडकरी यांची संकल्पना स्पष्ट केली. या महोत्सवाच्या माध्यमातून सुमारे १,६०० महिलांना रोजगार उपलब्ध होत असून, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासही हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महिलांना एकत्र येऊन संवाद साधण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी या उपक्रमातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

यावेळी निधी तेलगोटे म्हणाल्या, की ‘माझा प्रभाग, माझा परिवार’ या संकल्पनेतून प्रभागातील विकासकामांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते. अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण होते आणि प्रभागातील नातेसंबंध अधिक दृढ होतात. दिव्यांग महिलांसाठी विशेष आयोजन करण्यामागे प्रत्येकाला उत्सवात सहभागी करून घेण्याची भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.

दिव्यांग महिलांच्या हातांवर कांचनताई गडकरींनी रेखाटली मेहंदी; ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ उपक्रमाची सांगता

या कार्यक्रमाला कांचनताई नितीन गडकरी, दिव्याताई धुर्दे, प्रगतीताई पाटील, नंदाताई जिचकार, मनीषाताई काशिकर, वर्षाताई चौधरी, वंदनाताई शर्मा आणि स्वप्नाताई हिरणवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य, दिव्यांग आघाडीचे प्रतिनिधी आणि टेलिकॉम नगर परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषाताई काशिकर यांनी केले. दिव्याताई धुर्दे यांनी उपस्थितांना संबोधित केले, तर स्वप्नाताई हिरणवार यांनी आभार मानले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.