Published On : Fri, Nov 8th, 2019

कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सवा चा थाटात शुभारंभ

दि. ८ ते १० नोव्हेंबर तीन दिवसी य विविध कार्यक्रमाची रेलचेल.

कन्हान: – रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे ३ दिवसीय कन्हान-पिपरी सांस्कृतिक महोत्सवाचे समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिराने थाटात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.

Advertisement

शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी ११.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान व ओबीसी /एस सी/एस टी /एन टी जनजागृती समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिराचे उद्घाटन कन्हान नगराध्यक्ष मा शंकर चहांदे यांच्या अध्यक्षेत पोलीस निरीक्षक कन्हान मा चंद्रकांत काळे यांच्या हस्ते व समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात प्रदेश प्रोजेक्ट अधिकारी बी ए आर सी आय राहुल गायकवाड, प्रोजेक्ट कॉडनेटर बादल श्रीरामे, मार्गदर्शक कैलाश बोरकर, रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे आदीच्या प्रमुख उपस्थित महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.

Advertisement

सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत प्रसिध्द बाल संप्त खंजरी वादक कु तुळशी यशवंतराव हिवरे व्दारे परिवर्तनवादी समाज प्रबोधनाच्या कार्यक्रम. शनिवार (दि.९) ला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत समाज कल्याण विभागा व्दारे शासकीय विविध योजनांची माहिती शिबिर, सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत महाराष्ट्राची मराठमोळी मैदानी बुलंद तोफ, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक मा. शिवश्री तुषार उमाळे,प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत प्रा डॉ प्रदीप आगलावे, साहित्यिक मा धनराज डहाट आदींचे ओबीसी /एस सी/एस टी /एन टी सर्व बहुजन समाजाची दशा व दिशा या विषयावर मार्मिक समाज प्रबोधनपर मार्गदर्शन. रविवार (दि.१०) ला सकाळी ९ ते ११ वाजता समाज कल्याण विभागा तर्फे शासकीय विविध योजनां ची माहिती शिबिराचा समारोप.

सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत हिंदी भिम गितांचा युगल नजराणा. दुपारी ४ ते ५ वाजता रामटेक विधानसभा निवडणुकीत पराजित उमेदवारांच्या सत्कार सोहळ्या सह ३ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. करिता कन्हान व परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने ३ दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचा उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement