Published On : Wed, Aug 28th, 2019

कामठी सुंदर व आदर्श शहर होणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर:(कामठी) कामठी शहर जिल्ह्यात सुंदर व आदर्श होणार असल्याचाविश्वास राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिर परिसरात आयोजित दीड कोटी रुपयांच्या सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले

कामठी नगर परिषद अंतर्गत राम मंदिर ते डॉक्टर माहोरे व नेहरू मंच मोंढा परिसरात दीड कोटी रुपये मंजूर झालेल्या सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य व माजी मंत्री एड सुलेखा ताई कुंभारे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ता शामराव अस्वले, शहर भाजपाध्यक्ष विवेक मगतानी, प्रा मनीष वाजपेयी, बहुजन रिपब्लिकन एकता मंच नागपूर जिल्हा अध्यक्ष अजय कदम ,शहराध्यक्ष दीपक गणवीर,नगरसेविका पिंकी वैद्य, छोटू मानवतकर ,संध्या रायबोले, सुषमा सीलाम,लालसिंग यादव , स्नेहलता गजभिये ,प्रतीक पडोळे, ॲड आशिष वंजारी ,डॉ संदीप कश्यप,डॉ महेश महाजन उपस्थित होते

भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कामठी शहराला सुंदर व आदर्श करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे , शहरातील विविध विकास कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी जाणार नसल्याचे सांगितले , शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या नागरिकांना मिळावा हा माझा मुख्य उद्देश असून त्याकरिता कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

शहरात र्मोठ्या प्रमाणात विकास कामे करून कामठी शहराला नागपूर जिल्ह्यात सुंदर व एक आदर्श शहर बनवणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर भाजपाध्यक्ष विवेक मगतानी यांनी केले संचालन अशोक झाडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीकांत शेंद्रे यांनी मानले कार्यक्रमाला पंकज वर्मा ,सुभाष मागटांनी,सुनील सीलाम ,उज्वल रायबोले, उमेश म्हस्के , मनोहर गणवीर, उदास बनसोड सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.