Published On : Fri, Jun 7th, 2019

कामठी शहर दिसायला चांगलं मात्र वेशीला टांगलं!

दोन वर्षात कामठी नगर परिषद ला 52 कोटी रुपयांचा निधी

कामठी: नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा विकासात्मक दृष्टिकोनातून चेहरामोहरा बदलावा यासाठी ‘ब’ वर्ग कामठी नगर परिषद ला दरवर्षी करोडो चा निधी प्राप्त होत असतो या निधीची विल्हेवाट लावून विकासात्मक कामात या निधीचा पुरेपूर वापर करण्यात येत असला तरी शहराचा पाहिजे तसा विकास झालेला दिसून येत नाही .मागील दोन वर्षांचा विचार केला असता कामठी शहराच्या विकासासाठी कामठी नगर परिषद ला 52 करोड रुपये निधी अनुदान प्राप्त झाला असूनही ‘कामठी शहर दिसायला चांगलं ,मात्र वेशीला टांगलं ‘ अशी स्थिती आहे.

मागील दोन वर्षांत कामठी नगर परिषद ला प्राप्त शासकीय अनुदानची पाहणी केली असता शिवपंचायत मंदिरासाठी 3 करोड 66 लक्ष 17 हजार 814 रुपये, पायाभूत सुविधेसाठी 1 करोड 18 लक्ष 24 हजार रुपये, जिल्हा अग्निशामक साठी 71 लक्ष 66 हजार 720 रुपये, खासदार निधीतून 2 लक्ष 50 हजार रुपये, गंज के बालाजी मंदिरासाठी 1 करोड 22 लक्ष 25 हजार रुपये, अब्दुल्लाहशाह दर्गासाठी 1 करोड 79 लक्ष 82 हजार 783 रुपये, शास्कोय इमारतीसाठी 35 लक्ष रुपये, राणी तलाव तीर्थक्षेत्र साठी 1 करोड 37 लक्ष 22 हजार 750 रुपये, नावीन्यपूर्ण योजनेतून 95 लक्ष 75 हजार रुपये, दलिततोतर योजनेतून 2 करोड 25 लक्ष 12 हजार 105 रुपये, जिल्हा नग्रोत्थान साठी 3 करोड 76 लक्ष 25 हजार 369 रुपये , आमदार निधीतुन 25 लक्ष 56 हजार 237 रुपये, हुतात्मा स्मारक साठी 8 लक्ष 29 हजार 722 रुपये, वैशिष्ट्यपूर्ण आरोग्य अनुदान 2 करोड 40 लक्ष रुपये, दलित वस्ती सुधार योजना 6 करोड 31 हजार 624 रुपये, दलित वस्ती समाज भवन बांधकाम 5 करोड रुपये, अल्पसंख्याक साठी 30 लक्ष रुपये, अतिवृष्टी नादुरुस्त रस्ते साठी 5 करोड रुपये, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना साठी 4 करोड रुपये, विशेष रस्ता अनुदान साठी 6 करोड रुपये, तसेच पाण्याची टाकी साठी नगरोत्थान महाअभियांन योजनेसाठी 5 करोड 76 लक्ष 43 हजार रुपये असा एकूण मागील दोन वर्षात 52 करोड 10 लक्ष 62 हजार 124 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे यातील खासदार निधी अनुदान, शासकीय इमारत अनुदान, हुतात्मा स्मारक अनुदान, दलित वस्ती समाज भवन बांधकाम तसेच अल्पसंख्याक अनुदान तील करोडो रुपया च्या निधीतून एकही रुपयाचा खर्च करण्यात आला नसून तसेच प्रयोजन सुद्धा केले नसल्याने हा निधी शास्कोय तिजोरीत बंद आहे. एकीकडे शासनाकडून शहर विकासासाठी करोडो रुपयाचा निधी येत असून विकासात्मक नियोजित योजनाच न आखल्याने शहराचा विकास कसा होणार? अश्या चर्चेला शहरात उधाण आहे.

पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परिषदेशी संबंधित विषयांचा आढावा घेण्यासाठी आज 7 जून शुक्रवारला दुपारी 1 वाजता कामठी नगर परिषद मध्ये विशेष आढावा सभेचे आयोजन केले आहे.तेव्हा या सभेत निष्क्रिय कर्तव्यदक्ष भूमिका बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर घेऊन शहराच्या विकासात्मक विषय किती गांभीर्याने घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या सभेला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां तसेच माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे , नगराध्यक्ष मो शाहजहा शफाआत, उपाध्यक्ष , समस्त नगरसेवक, मुख्याधिकारी, उपजीलहाधिकारी,( न प), नझुल, , जिल्हा प्रशासन अधिकारी, एसडीओ वंदना सवरंगपते, तहसिलदार अरविंद हिंगे, अधीक्षक अभियंता महावितरण आदी अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित राहतील.


– संदीप कांबळे कामठी