Published On : Wed, May 29th, 2019

कामठी शहर हागणदारीमुक्तीत पास मात्र उघड्यावरील शौच अजूनही सुरूच !

Advertisement

कामठी: नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मौदा नगर पंचायत ला देश पातळीवर झालेल्या स्पर्धेत स्वच्छता सर्वेक्षण 2019 चा पुरस्कार मिळाला आहे तर त्याच विधानसभा क्षेत्रातील समावेश असलेले व नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे तालुकादर्जाप्राप्त कामठी ‘ब ‘ वर्ग नगरपरिषद च्या वतीने राबविण्यात आलेल्या हागणदारी मुक्त अभियानात कामठी शहर हागणदारी मुक्त झाल्याचे शासनदरबारी घोषित झाले असले तरी शहरातील कित्येक भागासह प्रभाग क्र 12 अंतर्गत येणाऱ्या सराय झोपडपट्टी तसेच बाबा अब्दुल्लाह शाह झोपडपट्टीत लाभार्थ्यांचे वर्ष लोटून अर्धवट शौचालय असल्याने या भागात उघड्यावर शौचास बसण्याची प्रथा अजूनही सुरू आहे.यानुसार कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातील मौदा नगरपंचायत चा देशपातळीवर चा पुरस्कार प्राप्त होतो मात्र कामठी शहराची हागणदारी मुक्ती ची ही स्थिती ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल…

केंद्र शासनाच्या वतीने 2 ऑक्टोबर 2014 ला महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्याने स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या संकल्पनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले त्यानुसार कामठी नगरपालिकेच्या वतीने तत्कालीन मुख्याधिकारी विपिन मुद्दा यांच्या कार्यकाळात मे 2015 ला वयक्तिक शौचालयाचा गाजावाजा करीत कामठी शहरात अभियान राबविण्यात आले या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शौचालय बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले शिवाय गुडमॉर्निंग पथकादवारे उघड्यावर शौच करणाऱ्या व्यक्तीवर दण्ड वसुली करीत प्रतिबंध सुद्धा घालण्यात आला यानुसार कित्येकांनी उघड्यावर शौचविधी करणे टाळत वयक्तिक शौचालय बांधकाम ला पुढाकार दाखवीत प्रयत्न साधले मात्र प्रभाग क्र 12 मध्ये या वयक्तिक शौचालय लाभार्थ्यांची पाहनी केले असता हागणदारी मुक्त अभियानाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतो.वास्तविकता प्रभाग क्र 12 अंतर्गत येणाऱ्या कामठी बस स्टँड च्या बाजुला असलेल्या सराय झोपडपट्टी मध्ये लाभार्थ्यांनी वयक्तिक शौचालय बांधकाम च्या लाभाचा अर्ज केला असता यांचा अर्जाला मान्य करीत शौचालय बांधकामास सुरुवात करण्यात आले मात्र या परिसरात बोटावर मोजणाऱ्या ठिकाणी शौचालय बांधकाम झाले असून कित्येक ठिकाणी अर्धवट बांधकाम झाले आहे आज वर्ष लोटूनही या अर्धवट बांधकामाला पूर्णत्वास करण्यात आले नाही हीच स्थिती बाबा अब्दुल्लाह शाह दर्गा परिसरातील सुद्धा आहे नाईलाजाने येथील दिव्यांग तसेच लहान लेकरे हे उघड्यावर शौचविधी करीत आहेत.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

9 जानेवारी 2018 ला केंद्र सरकारच्या समितीने केलेल्या सर्वेक्षनात अभियानाची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे दाखवून कामठी शहर हागणदारी मुक्त झाल्याचे जाहीर होण्यासह केंद्र सरकारने तसे प्रमाणपत्र सुद्धा कामठी पालिकेला बहाल करण्यात आले मात्र काही अशिक्षित नागरिकाचे भामट्या ठेकेदार कडून दिशाभूल झाल्याने कित्येक लाभार्थीचे शौचालय अनुदान मंजूर आहे अर्धवट बांधकाम झाले तर कुठे तळातील कामे झाले असून इतर ठिकाणी अजूनही अर्धवट शौचालय बनलेले आहेत त्यामुळे अजूनही काही भागातील नागरिकांची उघड्यावर शौचास बसण्याची सवय कायम आहे . तर दुसरीकडे गुडमॉर्निंग पथक हे कायमचे दिसेनासे झाल्याचे वास्तव आहे.

तेव्हा पालिका प्रशासनाने गुडमॉर्निंग पथकाची गस्त कायम ठेवत अर्धवट शौचालय बांधकामाचा प्रश्न मार्गी लावत उघड्यावर शौचास पायबंद घालण्याची मागणी सुज्ञ कामठी करांतर्फे होत आहे तसेच कामठी नगर परोषद चे विद्यमान मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मौदा नगर पंचायत ला स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार मिळवून देण्यात यशाची शिखर गाठली तीच शिखर कामठीत सुद्धा गाठून कामठी नगर परोषद ला पुरस्काराचे मानकरी ठरवावे अशी मागाणी सुद्धा जोर धरू लागली आहे.

– संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement