Published On : Fri, Oct 4th, 2019

कामठी विधानसभा मतदार संघाची भाजप ची उमेदवारी टेकचंद सावरकरला

Advertisement

18 उमेदवारांनी सादर केले 21 उमेदवारी अर्ज

कामठी:-येत्या 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून मानल्या जाणाऱ्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार आज 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत 18 उमेदवारांनी 21 नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर केले.त्यातच मागील चार दिवसांपासून कामठी विधानसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवारीची उत्सुकता आज शिगेला पोहोचत उत्सुकतेला विराम मिळाला असून भाजप च्या उमेदवारीचे सस्पेन्सला आज दुपारी 2.45ला आलेल्या बी फॉर्म वरून संपुष्टात आला तर भाजप ची उमेदवारी बाबत पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांना नाकारून तसेच पालकमंत्री बावनकुळे पत्नी ज्योतिताई बावनकुळे यांनी भाजप च्या नावावर नामनिर्देशन पत्र सादर केले मात्र पक्षाने यांना सुद्धा डच्ची देत हे पक्षीय बी फॉर्म मौदा तालुक्यांतर्गत येणाऱ्या धानला येथील रहिवासी व माजी जो प अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकरला देऊन चर्चेला बी फॉर्म च्या सस्पेन्स चर्चेला विराम दिला.

आज पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी श्याम मंदनूरकर कडे सादर केलेल्या अर्जानुसार भाजप च्या नावावर ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 उमेदवारी अर्ज सादर केले तसेच अनिल रामभाऊ निधान व टेकचंद श्रावण सावरकर यांनी सुद्धा भाजप पक्षाच्या नावावर नामनिर्देशन अर्ज सादर केले यात भाजप चे बी फॉर्म हे टेकचंद सावरकर च्या नावाने दिले असून दुसरे सह नाव अनिल निधान यांचे आहे यामध्ये उद्या 5 ऑक्टोबर ला असलेल्या अर्ज छाननीत कदाचित टेकचंद सावरकर यांचा अर्ज रद्द झाल्यास अनिल निधान यांना भाजप ची उमेदवारी जाहीर होईल.

कांग्रेस पक्षाकडून बी फॉर्म जोडलेले असलेले कांग्रेस चे सुरेश भोयर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला तसेच ज्ञानेश्वर उर्फ नाना कंभाले यांनी अपक्ष तसेच कांग्रेस च्या नावावर उमेदवारी अर्ज सादर केले. वंचित बहुजण आघाडी कडून राजेश बापूराव काकडे यांनी दोन अर्ज सादर केले.बहुजन समाज पार्टी कडून प्रफुल आनंदराव मानके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.एम आई एम आई एम कडून शकीब अतिक्यु रहमान , राष्ट्रीय जनसंभावना पार्टी कडून गौतम नामदेव गेडाम भन्ते धम्मप्रिय, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया कडून अशोक राजाराम रामटेके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.तर अपक्ष उमेदवार म्हणून भीमा बोरकर, चंद्रशेखर अरगुल्लेवार, सुलेमान अब्बास चिराग अली हैदरी, गणेश बापूराव पाटील, शुभम संजय बावंनगडे , रंगनाथ विठ्ठल खराबे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.

कामठी विधानसभा मतदार संघातून भाजप ची उमेदवारी तिकीट कुणाला याबाबत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशीच्या 2.45वाजेपर्यंत सस्पेन्स राहिले नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा शेवटच्या दुपारी 3 वाजेपर्यंत असलेल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोद्दार व श्रीकांत देशपांडे यांनी पक्ष उमेदवारी चा बी फॉर्म धडकले तेव्हा बी फॉर्म चा सस्पेन्स ला विराम मिळाला त्यात हा बो फॉर्म भाजप च्या नावावर उमेदवारी अर्ज भरलेल्या ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे साठी नसून उमेदवारी अर्ज सादर करणारे माजी जी प सदस्य अनिल निधान व टेकचंद सावरकर यांच्यासाठी असल्याचे कळताच सस्पेन्स अजून वाढले मात्र पक्षाने च गेम करून चंद्रशेखर बावनकुळे ला शेवटपर्यंत अश्वसित करून उमेदवारी तिकीट पासून वगळले तसेच उमेदवारी अर्ज केलेल्या ज्योती बावनकुळे ला ही उमेदवारी तिकीट पासून वगळल्याने सर्वांना एकच धक्का बसला तर ही उमेदवारी तिकीट टेकचंद सावरकरला देण्यात आले असले तरी उद्याच्या अर्ज छाननीत टेकचंद सवरकरचा अर्ज रद्द होताच अनिल नोधान यांना उमेदवारी जाहीर होईल.

संदीप कांबळे कामठी