Published On : Sun, Jun 21st, 2020

एक आरोग्य कर्मचारी व एक तरुणी निघाली कोरोना पॉजिटिव्ह

कामठीत आज दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात आरोग्य निरीक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची सतत आरोग्य तपासणी करून नजर ठेवुन आहेत तरीसुद्धा कोरोना चा कहर हा नियंत्रणाबाहेर जात असून खैरी गावातील तीन मजुर कोरोना बाधित आढळल्याच्या घटनेला दोन दिवस लोटत नाही तर आज कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या गांधीनगर तसेच ग्रामीण भागातील येरखेडा येथे एक तरुणो कोरोना बाधित आढळल्याने शहरात हळहळ व्यक्त करोत कोरोना विषाणूची भीती पसरायला लागली आहे.

गांधीनगर येथिल आढळलेला 35 वर्षीय तरुण हा नागपूर च्या मेयो इस्पितळात परिचारक म्हणून आरोग्य कर्मचारी आहे तर या कोरोनाबधित रुग्णाने मेयो इस्पितळातच स्वतःच्या स्वब च्या नमुने ची तपासणी केली होती या रिपोर्ट च्या अहवालात कोरोना पोजिटिव्ह असल्याचे नोंदर्शनास आले तसेच येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या वार्ड क्र 4 येथील रामकृष्ण ले आउट येथील तरुणी ही नागपूर च्या एका खाजगी रुग्णालयात गॅस्ट्रो च्या उपचारासाठी गेली असता संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याने दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोना ची तपासणी करून घेतली या तपासणी अहवालात सदर तरुणी कोरोना बाधित असल्याची घटना निदर्शनास आली.

माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे , मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर,वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनो, एपीआय शेख व आरोग्य पथक यांनी त्वरित गांधीनगर गाठून कोरोनाबधित आढळलेल्या त्या आरोग्य कर्मचाऱ्याला पुढील उपचारार्थ नागपूर च्या मेयो इस्पितळात शास्कोय विलीगिकरन कक्षात हलविण्यात आले तर या रुग्णांच्या प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील 16 लोकांना नजीकच्या वारेगाव येथील कोविड सेंटर मध्ये तपासणी साठी हलविण्यात आले यांची तपासणी अहवाल काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सदर परिसर पुढील 28 दिवसासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे तसेच येरखेडा येथील रामकृष्ण ले आउट मधील आढळलेली तरुणी ही कोरोना बाधित आढळल्याचे माहिती मिळताच तिला सुद्धा 108 च्या वाहनाने पुढील उपचारार्थ नागपूर च्या शासकीय विलीगी करण कक्षात हलविण्यात आले तर तिच्या घरातील सदस्यांना होम कोरॉनटाईन करून तिच्या घरातील सदस्यांच्या घशाचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले या अहवालातूनच कोरोना ची तपासणी अहवाल स्पष्ट होईल.

तर हा परिसर सुदधा पुढील 28 दिवसासाठी प्रतिबंधित करण्यात आले तसेच ही कोरोना बाधित तरुणी वारीसपुरा येथील वडिलांच्या किराणा दुकानात बसून हातभार लावत असे तेव्हा हिच्या संपर्कात आलेल्या अजून किती लोकांना या कोरोना ची लागण झाली असेल याचा अंदाज ही व्यक्त करता येत नाही.

कामठी तालुक्यातुन एकूण 18 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत त्यातील 10 रुग्ण हे बरे झाले असून सध्यस्थीतीत कोरोना बधितांची संख्या ही 8 आहे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी