Published On : Thu, Aug 23rd, 2018

कांबळे दुहेरी हत्याकांड पर राज्यात चालविन्या करिता सर्वोच्च न्यायालयात आरोपी तर्फे दाखल केलेली याचिकामध्ये सरकारला नोटिस जाहिर केले.

Advertisement

Rashi and Usha Kamble Murder

दिल्ली /नागपुर : बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड मधील आरोपिंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असुन नागपुरात चालत असलेला खटला देशातील दूसऱ्या राज्यात चालविन्या करीता माननीय सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर पिटीशन याचिका दाखल केलेली होती.

आरोपिंनी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9)यांच्या वर असे आरोप केले की ते राजकीय दबावात कांबळे दुहेरी हत्याकांड हा खटला चालवित आहे .

आरोपींना सर्वोच्च न्यायालय उपरोक्त संधी मिळावी म्हणुन माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब (DJ- 9)यांनी आरोपीना 15 दिवसात सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया करण्याकरिता वेळ दिला .

आरोपिच्या वतीने न्यायाधीश श्री ए.एस.काझी साहेब , पोलिस व सरकार यांच्यावर थेट आरोप लाऊन आरोपीनी सर्वोच्च न्यायालयात ट्रांसफर याचिका दाखल केली होती , त्या केस ट्रांसफर पिटीशन ची सुनवाई आज दिनांक 23/8/2018 गुरुवार रोजी मा. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया दिल्ली येथे ठेवण्यात आलेली होती .

माननीय ट्रिपल बेंच चे न्यायमुर्ति कोर्ट नंबर 3- मा. न्यायमुर्ति मदन बी. लोकुर, मा.न्यायमुर्ती एस. अब्दुल नझीर, मा. न्यायमुर्ती दिपक गुप्ता यांनी आरोपिच्या वकीलांची बाजु एकली व सरकारची बाजू एकली .

युक्तिवादामध्ये आरोपिच्या वकीलानी सत्र न्यायालया समोरील खटल्याला स्थगिति मागन्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराष्ट्र राज्य मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की माननीय जिल्हा सत्र न्यायालयावर कोनताही दबाव नाही हे एकल्यानंतर माननिय सर्वोच्च न्यायालयाने आरोपिच्या वकीलाना स्थगिति (स्टे) नदेण्यास नकार दिला .

तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारला व फिर्यादिला नोटिस जाहीर करुण चार आठवडयात रिप्लाई (उत्तर) फाईल करण्याचे आदेश दिले .
ज्याअर्थी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिति (स्टे) दिलेला नाही त्या अर्थी माननीय जिल्हा सत्र न्यायालय केस मध्ये पुढील कारवाई (चार्जफ्रेमिंग) करू शकते .
सरकारतर्फे चीफ स्टैंडिंग काउंसिल स्टेट ऑफ महाराष्ट्र सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया चे मुख्य अधिवक्ता निशांत कातनेश्वरकर साहेब यांनी बाजु मांडली .

आरोपी तर्फे adv रामेश्वर प्रसाद गोयल यांचे सहकारी Adv गगन सांगी , adv देवेंद्र चव्हाण व सिनियर अधिवक्ता शेखर नाफड़े यांनी बाजु मांडली