Published On : Thu, Feb 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

कामठीत ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत; एमडी ड्रग्ससह २३ वर्षीय तरुणाला अटक!

Advertisement

नागपूर : शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन थंडर – लेट्स युनाइट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी’ अंतर्गत न्यू कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) पावडरसह २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून अमली पदार्थांसह एकूण ७२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर सुरू असलेल्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेचा हा भाग असून ड्रग्ज विक्रेते, वाहक आणि ग्राहकांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे.

Gold Rate
Feb 11th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,500/-
Gold 22 KT ₹ 1,46,500 /-
Silver/Kg ₹ 2,63,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २.२० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास न्यू कामठी पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयित व्यक्तीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कळमना रोडवरील सेबल लॉनजवळ एमएच-३१-एचएफ-९७१३ क्रमांकाची करड्या रंगाची मोपेड अडवली.

वाहनचालकाने आपले नाव दुश्यंत जगदीश झारपुरे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जुना कळमना परिसर) असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान वाहनाच्या डिकीत झिप-लॉक पिशवीत लपवून ठेवलेली १.२२ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.
याशिवाय आरोपीकडून दोन मोबाईल फोन, संबंधित मोपेड आणि ९०० रुपये रोख रक्कम असा एकूण ७२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान आरोपीने ही एमडी पावडर कळमना गावातील गुलशन समुद्रे (वय २७) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. गुलशन समुद्रे सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. अमली पदार्थांची विक्री करून अवैध नफा कमावण्याच्या उद्देशाने आरोपी हे ड्रग्ज घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी न्यू कामठी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(अ) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement