
कामठी :-महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राज्यात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामठी नगर परिषद ने केलेल्या कामगिरीत या अभियानात सहभागी झालेल्या राज्यातील 235 नगर परिषद , नगरपंचायत मधून कामठी नगर पालिकेचा राज्यामध्ये 70 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीस नागरिकांचा सहभाग करण्यास व्यापक प्रसिद्धी , बॅनर, पोस्टर, स्टिकर, रंगरंगोटी करण्यात आली, शहरात सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीतील सहभागी लोकांना हरित कायद्याचे पालन करण्याचे शपथ देण्यात आली. वातावरणात हवा किती प्रमानात आहे यासाठी वायु टेस्टिंग करण्यात आली त्यासाठी तीन ग्रीन झोन उभारण्यात आले होते ज्यामध्ये पोरवाल पार्क, हुतात्मा स्मारक, तसेच मुस्लिम कब्रस्तान चा समावेश होता.विना इंधन वाहन प्रोत्साहन देण्यासाठी ई सायकलिंग, नो व्हेइकल डे साजरा करण्यात आले, इंधनाची बचत कशी होते याबाबत नागरिकांना जनजागृत करण्यात आले.माझी वसुंधरा शपथ अभियान राबविण्यात आले त्यासाठी बऱ्याच उपक्रमातून जनजागृती करण्यात आली.फेरीवाल्याना हरितक्रांतीचे शपथ देण्यात आली.या अभियान अंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निकषां अंतर्गत हरित आच्छादन चे धडे नागरिकांना देण्यात आले.
5 जुन रोजी पर्यावरण दिन असल्यानिमित्त जाहिर झालेल्या निकालानुसार अभियानात सहभागी राज्यातील 235 नगरपरिषद, नगरपंचायत मधून कामठी नगर परिषद चा राज्यातुन 70 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.या अभियानात नागरिकांच्या व्यापक सहकार्यामुळे कामठी नगर परिषदेस वरील क्रमांक प्राप्त झाला आहे.यावेळी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यस्त झाल्यामुळे अपेक्षित निकाल हाती न लागल्याची खंत बोलून दाखविली तरीसुद्धा या अभियानात सहभागी सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त करून घराजवळ वृक्षारोपण त्याचे संगोपन करावे, सौरऊर्जा, नॉन मोटोराईज वाहनाचा वापर करावा, हरित इमारतीचे निर्माण करावे, रेन वाटर हार्वेस्टिंग , जलस्रोतांचे हरित क्षेत्रांचे संवर्धन करण्याचे आव्हान केले.
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...




