Published On : Tue, Apr 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

कामठी कंटोन्मेंट बोर्ड भरती घोटाळा ; सीबीआयकडून माजी सीईओची चौकशी, घोटाळ्याशी संबंधित दस्ताऐवज जप्त

Advertisement

नागपूर : कामठी कंटोन्मेंट बोर्ड भरती घोटाळ्याची संबंधित नवनवीन खुलासे होत आहे. सीबीआयकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयने भरती घोटाळ्याच्या प्रकरणाशी संबंधित माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अभिजीत यांची चौकशी करून तपास तीव्र केला आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीतचे इतर आरोपींसोबतचे संबंध तपासण्यासाठी त्याची सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली. तपासकर्ते त्याचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे उघडकीस आणत होते. जे एका आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये दिसले आणि त्याच्या घरातून घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सापडली. डायरीमध्ये KCB मध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांकडून मिळालेल्या 1.50 कोटी रुपयांच्या नोंदी आहेत.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अभिजीत सध्या दिल्लीत असून सीबीआयच्या नागपूर कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. माजी सीईओसह केसीबीचे इतर अनेक अधिकारी रडारवर आहेत. त्यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.विविध पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली CBI ने KCB च्या काही अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यावर हा घोटाळा समोर आला. सीबीआयने या घोटाळ्याच्या संदर्भात काही लोकांना अटक केली आहे. या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी सीबीआय केसीबीशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर छापे टाकून झडती घेत आहे.

दरम्यान, यापूर्वीच अटक करण्यात आलेला आरोपी दीप रमेश सकटे, चंद्रशेखर कुवरलाल चिधलोरे, उमेदवार (माळी पदासाठी निवडलेले) आणि नर्सरी शिक्षक यांना सोमवारी सीबीआयने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची रवानगी मॅजेस्टेरियल कोठडीत केली आहे.

Advertisement
Advertisement