नागपूर :लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुक ऑफ इंडियात नोंद असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे हिने आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ती लाल कलरच्या फ्रॉकमध्ये होती. शाई लावलेले बोट उंचावून तिने मतदान केल्याचे सांगितले.
नागपुरात जन्मलेल्या ज्योती किसनजी आमगे हिला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार आहे. ज्योती २००९ मध्ये जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आली, जेव्हा ती फ्युजी टिव्हीच्या एक कार्यक्रमात दिसली. त्यानंतर ती त्याच वर्षी मिका सिंगच्या एका गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसली. तिने चॅनलचार डॉक्युमेंट्री बॉडीशॉकमध्ये ती दिसली. या शोमध्ये डॉक्टरांनी तिची उंची मोजली असता, ती फक्त ६१.९५ सेंटीमीटर म्हणजेच सुमारे दोन फूट उंचीची असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला सर्वात लहान जगातील सर्वात लहान महिला म्हणून मान्यता मिळाली.
ज्योतीचे सोशल मीडियावर १.६ मिलीयनहून अधिक फॉलोवर्स आहेत.सध्या ती ३० वर्षांची आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटोज टाकत असते.यामध्ये ती मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे असे आवाहन करताना दिसते. ज्योतीसोबत तिच्या कुटुंबियांनी देखील मतदान केले.