नागपूर : नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग… pic.twitter.com/EJuXHXOypd
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 9, 2024