
औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ६६व्या वर्षी निधन झाले . मुळच्या नागपूरच्या असलेल्या मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर१९८० आणि ९० या दोन दशकातील मराठीतील अग्रगण्य महिला पत्रकार होत्या ; गेल्या पांच वर्षांपासून त्या औरंगाबादला स्थायिक होत्या .
नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणी आणि याच दैनिकाच्या महाराष्ट्र आवृत्तीचे संपादकपद त्यानी सांभाळले होते . १९८३ ते १९९० या काळात ‘लोकसत्ता’च्या नागपूर येथील वार्ताहर म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे .
मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांनी विविध वृत्तपत्रे , नियतकालिके आणि आकाशवाणीसाठी विपुल लेखन केलेले आहे . गेल्या चार वर्षापासून त्या पक्षाघात आणि असाध्य पार्किन्सनने आजारी होत्या .
मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांच्या पश्चात पती , ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर , विवाहित कन्या सायली , जावई दीपक ग्यानानी , भाऊ श्रीकांत आणि खूप मोठा आप्त व मित्र परिवार आहे . मंगला बर्दापूरकर यांच्या पार्थिवावर उद्या , ७ मार्चला सकाळी ९ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येतील .
अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड
बच्चियों से छेड़छाड़ करने वालों को फाँसी तक की सजा मिलनी चाहिए।
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...




