Published On : Mon, Mar 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची संयुक्त कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

नागपूर – सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा विषय “कायदा आणि मानव संसाधन विकास: बदलत्या जगात संधी आणि आव्हाने” होता.

कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. विजेंद्र कुमार यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेत कंपनी सचिव दीप्ती जोशी यांनी “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2013” या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी कायद्याची तरतूद, त्याचे महत्त्व, अंमलबजावणी आणि त्याचे पालन करण्याबाबत माहिती दिली. तर, कंपनी सचिव शंतनू जोग यांनी “मानव संसाधनातील कायदेशीर व्यावसायिकांची भूमिका” या विषयावर व्याख्यान दिले.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात त्यांनी वकिली आणि सल्लागार क्षेत्रातील आपल्या अनुभवांवर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंडोरामाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन-औद्योगिक संबंध) आणि औद्योगिक संबंध क्षेत्रातील तज्ञ डॉ. सुरेश पंदिलवार यांनी “औद्योगिक संबंधांमधील आव्हाने” या विषयावर व्याख्यान दिले. यात त्यांनी बदलत्या जगात औद्योगिक संबंधांमध्ये येणाऱ्या विविध आव्हानांवर प्रकाश टाकला. या कार्यशाळेची माहिती सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्चचे अध्यक्ष व केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे सल्लागार डॉ. कपील चांद्रायण यांनी विद्यार्थ्यांना सेंटर फॉर डेवलपमेंट रिसर्च बद्दल माहिती देतांना विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या अनेक संधीं बद्दल अवगत केले. डॉ. अविनाश आचार्य, वरिष्ठ व्यवस्थापक (मास – विधी), महावितरण यांनी परिसंवादाचे प्रास्ताविक भाषण केले आणि कार्यशाळेतील तीन विषयांची विस्तृत माहिती देतांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

या कार्यशाळेला कुलसचिव डॉ. आशिष दीक्षित, प्राध्यापक डॉ. मुक्ताई चव्हाण देब, डॉ. रमण तिरपुडे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरली. यातून विद्यार्थ्यांना कायदा आणि मानव संसाधन विकास या क्षेत्रातील विविध पैलूंबद्दल माहिती मिळाली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement