Published On : Thu, Jun 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीण पोलिसांचा झारखंडमध्ये धडाकेबाज छापा; २.२८५ किलो अफूसह आरोपींचे जाळे उघड!

Advertisement

उमरेड : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यातून २ किलो २८५ ग्रॅम अफू (अफिम) जप्त केली आहे. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह एकूण १३ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

उमरेड येथे २० मे २०२६ रोजी दाखल झालेल्या अफू तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करताना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात झारखंडमधील सिमडेगा येथे छापा टाकून हॉटेल व्यावसायिक मनीषकुमार अंबिकाप्रसाद (वय ४६) याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून ३३.७६७ किलो अफू, २३.३५ लाख रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य असा तब्बल १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने अटक आरोपीची सखोल चौकशी केली. त्यातून झारखंडमधील खूंटी जिल्ह्यातील विमलसिंह मुंडा हा मुख्य पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे समोर आले. त्यानंतर बुंडू शहरातील त्याच्या कुटुंबीयांची माहिती मिळवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची झडती घेताना पोलिसांना मोठ्या प्रमाणात अफू आढळून आली.

३ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत २ किलो २८५ ग्रॅम अफू (अफिम) किंमत ११ लाख ४२ हजार ५०० रुपये, एक लॅपटॉप, दोन मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १३ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीतील आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk | Video

Nagpur Protest: Protesters Sing National Anthem During Police Detention | Samvidhan Chowk...

nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges