Published On : Sat, Mar 17th, 2018

विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचं निधन

Advertisement

नागपूर : बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू (वय ६८) यांचं आज उपचारादरम्यान निधन झाले. सोमवारी रात्री ओला कॅबने दिलेल्या धडकेत जैमिनी कडू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूरमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते परंतु, आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

प्राध्यापक कडू हे सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना वर्धा मार्गावरील ‘रेडिसन ब्लू’ परिसरात ओला कॅबने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात कडू यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. कॅब चालकाने त्यांना शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. त्यानंतर तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परंतु, आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचं अपघाती निधन झाल्याने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement