नागपूर : शहरातील जरिपटका भागात कर्जाच्या पैशांच्या वादातून एक धक्कादायक खून उघडकीस आला असून, ३८ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४६ वर्षीय आरोपीला अटक केली असून तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
मृतक राहुल सुनील साहू (रा. नागपूर) हा २० एप्रिल रोजी आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. मात्र तो परत न आल्याने त्याचा भाऊ लकी साहू यांनी दुसऱ्या दिवशी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शोधमोहीम सुरू असतानाच २२ एप्रिल रोजी नारा घाट पुलाखाली एका पोत्यात गुंडाळलेला मृतदेह आढळून आला आणि प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.
प्राथमिक तपासात राहुलच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने ओळख लपवण्यासाठी मृतदेह लाल चादरीत गुंडाळून पोत्यात भरला, दोरीने घट्ट बांधून नाल्यात फेकून दिला होता.
या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी नवीन पंजबराव पुंडकर (रा. कोहिनूर सोसायटी, नारा) याला अटक केली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, कर्जाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे हा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपीने घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे परत करूनही मृतकाकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने संतापातून त्याने घरीच हत्या केल्याचे उघड झाले.
खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





