Published On : Tue, Oct 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. परिसरात आयटीची धाड; नितिन खारा अडचणीत

Advertisement

नागपूर: नितिन खारा यांच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लि. अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या गो गॅस कंपनीच्या गोदामावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान कंपनीकडे ठेवलेल्या एलपीजी गॅसच्या स्टॉकची तपासणी करण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कंपनीकडे स्टॉक लाइसन्सशिवाय एलपीजी गॅस ठेवणे आणि त्याची खरेदी-विक्री करणे हा कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यामुळे कंपनीवर बिना परवानगी व्यवसाय चालवण्याचे आरोप करण्यात आले आहेत.

गेल्या सहा वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या छापेमारीत कंपनीच्या विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. त्या वेळीही काही बिनलायसन्स व्यवहार आढळले होते.

आयकर विभागाच्या या कारवाईबाबत अधिक माहिती आणि तपशीलवार बातमी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.