Published On : Wed, Nov 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मतदार यादीत नाव शोधणे अत्यंत सोपे असं शोधा प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीत नाव

Advertisement

नागपूर, : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दिनांक ०१.०७.२०२५ या अर्हता दिनांकावर आधारित संबंधित विधानसभा मतदार यादीचे विभाजन करुन प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली असून, नागरिकांच्या माहीतीकरीता गुरूवार २० नोहेंबरपासून मनपा झोन कार्यालय व नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.nmcnagpur.gov.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

मनपाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीत सर्व सामान्य नागरिकांना आपले नाव सहजपणे शोधता यावे, याकरिता त्यांना दोन पद्धतींचा अवलंब करता येणार आहे. मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात यादी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली असून, ही यादी डाऊनलोड देखील करू शकतात. या पीडीएफमध्ये ईपिक (EPIC) क्रमांकावरून नाव शोधता येईल. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून नाव आणि ईपिक (EPIC) क्रमांकावरून आपले नाव सहजपणे शोधात येईल.

Gold Rate
26 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,25,900 /-
Gold 22 KT ₹ 1,17,100 /-
Silver/Kg ₹ 1,58,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पहिली पद्धत:

सर्वप्रथम https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे, त्याखाली असलेल्या मनपा निवडणूक २०२५ या पॉप-अपवर क्लिक करा, लगेच दुसरी विंडो उघडेल. त्यावर असणाऱ्या ड्राफ वोटर लिस्ट २०२५ वर क्लिक करा. येथे प्रभाग निहाय प्रारूप यादी दिसेल.

आपला प्रभाग निवडा. पीडीएफ उघडल्यावर Ctrl+F बटण दाबा. सर्च पर्याय दिसल्यावर त्यामध्ये आपला ईपिक (EPIC) YKBXXXX.. क्रमांक टाकून सर्च करा.

दुसरी पद्धत :

सर्वप्रथम https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर जावे. येथे जाण्याकरिता मनपाच्या https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दिसणाऱ्या “Search Name In The Voter List Of Maharashtra” या पॉप-अपवर क्लिक करू शकता. लगेच दुसरी विंडो उघडेल त्यावर नाव आणि ईपिक (EPIC) क्रमांक असे दोन पर्याय दिसतील.

नावाने शोधायचे असल्यास: विचारलेली सर्व माहिती (जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव इ.) भरून सर्चवर क्लिक करा. त्यानंतर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल. EPIC क्रमांकाने शोधायचे असल्यास: EPIC क्रमांक व आवश्यक माहिती भरून सर्च वर क्लिक करा. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती प्रदर्शित होईल.

Advertisement
Advertisement