Published On : Wed, Feb 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

लेझर ड्रोन लाईट शो द्वारे शिवजयंती साजरी

Advertisement

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण नागपूर द्वारे आमदार मोहन मतेंच्या मार्गदर्शनात सक्करदरा तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रोन लाईट शो, लेझर मॅपिंग शो तसेच फटका शो चे भव्य आयोजन करण्यात आले. शिवाजी महाराजांवरील लघुकथापट तसेच भारतीय संस्कृतीची संक्षिप्त गाथा अत्यंत सुंदररित्या मोकळ्या आसमनतात अंकीत करण्यात आली, या उत्साहपूर्ण कार्यक्रमात सुमारे ४०००० हून अधिक युवक-युवती तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांद्वारे मेक इन इंडिया च्या आधारे तयार केलेल्या या तंत्रात्मक कलाकृ‌तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

उपरोक्त शिवजयंती सोहळा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नागपूर संस्थांचे राजे मुधोजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेत पार पडला. सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून भारतीय जनात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. संजयजी भेंडे, विधानपरिषदेचे माजी सदस्य श्री. गिरीशजी व्यास, भाजपा शहर उपाध्यक्ष श्री. संजयजी ठाकरे, नागपूर संस्थांचे राजे संग्राम सिंह भोसले, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोज सुर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कोते साहेव, नागपूर विद्यापीठाचे श्री. विष्णुजी चांगदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण नागपूरच्या भाजयुमो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.