
नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आले.
क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत विनेशने काल अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण आज पुन्हा वजन केल्यानंतर तिचे वजन ५० किलोपेक्षा थोडे जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले हा भारतीयांसाठी मोठा धक्का मनाला जात आहे. फोगाट अपात्र ठरल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर दुःख व्यक्त केले. तसेच तिला धीर देत मोलाचा संदेशही दिला.
विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत,असे ट्विट मोदींनी केले आहे.
RTO में रिश्वत का खेल बेनकाब! #NagpurNews #NagpurRTO #RTO #RTOScam #RTOCorruption #ACBRaid...
चुनाव आयोग बीजेपी का एजेंट, राऊत का गंभीर आरोप #maharashtranews #delhi #newsupdate...
दो बाइक की भीषण टक्कर! WCL कर्मचारी की मौत #Nagpur #RoadAccident #BikeAccident...
लॉज की आड़ में कथित देह व्यापार का खेल! नाबालिग समेत तीन...
राजापेठ हादसे के बाद नागरिकों का फूटा गुस्सा #vidarbhanews #amravati #newsupdate #vidarbha
ATM में शातिर ठग का खेल! असली कार्ड रखा, दूसरा थमाया #NagpurNews...




