कामठी ता -स्थानिक खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दहेगाव समोरील पिपळा फाटा येथे एकल जीवन जगत आईस गोला चा व्यवसाय करणाऱ्या एका 52 वर्षीय इसमाचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून डोक्यावर लोखंडी टिकासने वार करून जागीच मृत्यमुखी पाडल्याची घटना आज सकाळी 11 वाजे दरम्यान निदर्शनास आली असून मृतक इसमाचे नाव संतोषनाथ गोकुलनाथ सोलंकी वय 52 वर्षे रा पिपळाफाटा खापरखेडा असे आहे.खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात या खून प्रकरणातील आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असुन याचा लहान भाऊ व याच्या कुटुंबातील इतर सद्स्य नजीकच्या धापेवाडा येथे वास्तव्यास आहेत.तर मृतक हा मागील काही वर्षांपासून पिपळाफाटा येथील एका झोपडीत वास्तव्यास असुन आईस गोलाचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होता.
आज सकाळी 11 वाजता सदर घटना निदर्शनास आले असता पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले.तर सदर घटनास्थळी खून करण्यात वापर करण्यात आलेल्या लोखंडी टिकास जप्त करण्यात आले.खुनाचे कारण अजूनही गुलदस्त्यात असूनअज्ञात मारेकरी ही पोलिसांच्या अटकेबाहेर असून पुढील तपास सुरू आहे.