Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात घातक शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला अटक; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

Advertisement

नागपूर :सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा नागपूर शहर यांच्या पथकाने घातक शस्त्र बाळगणाऱ्या एकास अटक करत महत्त्वपूर्ण कारवाई केली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कायलाइन इम्पेरियल, नान्हे लेआउट येथून अब्दुल वाहिद वाजिद कुरेशी (वय 40) यास स्टीलची तलवार बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई दिनांक 2 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता ते रात्री 10.30 च्या सुमारास करण्यात आली. सामाजिक सुरक्षा पथक पेट्रोलिंग करीत असताना अब्दुल वाहिद हा घातक शस्त्र (तलवार) घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला.

आरोपीकडून एक स्टीलची तलवार (सुमारे किंमत ₹2000/-) पोलिसांनी जप्त केली आहे.

घटनेनंतर आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाहीसाठी मानकापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

संबंधित इसम हा पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार असून सध्या मकोका प्रकरणात जामिनावर बाहेर आहे.

ही कामगिरी सामाजिक सुरक्षा पथकाचे पी.आय. ओमप्रकाश सोनटके यांच्या मार्गदर्शनाखाली एचसी प्रकाश माथनकर (फिर्यादी), एचसी सचिन, पीसी अश्विन मांगे, समीर शेख, कुनाल मासराम, कुनाल बोकडे आणि डब्ल्यूपीसी पूनम शेंडे यांनी केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.