Published On : Wed, Apr 11th, 2018

ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे संवर्धन केले जाईल : ऊर्जा मंत्री बावनकुळे

Advertisement

Chandrashekhar Bawankule

नवी दिल्ली: चंद्रपूर जिल्ह्यातील महाजनको अंतर्गत येणा-या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

नार्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहिर यांच्या कक्षात आज चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागानी निगडीत विविध समस्यांवर बैठकीचे आयोजित करण्यात आली. या बैठकीस महाजनको चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषण चे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल संचालक (खाण) श्याम वर्धने, उपस्थित होते.

इराई धरणाचे संवर्धन केले जाईल
यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) चा वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लागणारे पाणी हे इराई धराणातून आणले जाते. सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीज निर्मिती करण्यास पुढील काळात समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी चारगाव धरणाचे पाणी इराई धरणाला सोडले जाईल असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाण्याची पातळी वाढविण्यासंदर्भातील इतर उपाय योजनाही आखण्यात येतील असे श्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. इराई धरणाचे संवर्धन करण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिका आणि महाजनकोमध्ये करार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बरांज कोळसा खाणीशी करार करण्यात येईल
चंद्रपूर जिल्ह्यात असणा-या वीज निर्मिती प्रकल्पाला रेल्वे मार्गाने कोळसा पुरविण्याकरिता अधिक खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी जवळच असलेल्या बरांज कोळसा खाणीतुन कोळसा मिळाल्यास सुविधा होऊ शकते. यासाठी बरांज कोळसा खाणीशी पुढील काळात करार करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Advertisement

Chandrashekhar Bawankule (1)

सौरऊर्जा महामंडळाच्या मदतीने ऊर्जा प्रकल्प उभारणार
महाजनको चा चंद्रपूर जिल्ह्यातील रिकाम्या जागेचा अभ्यास करून याठीकाणी भारत सरकारच्या सौरऊर्जा महामंडळ आणि महाजनकोमध्ये करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे बैठकीत निश्चीत करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गांवामध्ये सीएसआर च्या माध्यामातून कामे करणे
चंद्रपूर जिल्ह्यातील जी गावे खाणीसाठी अथवा ऊर्जा प्रकल्पांसाठी अधिग्रहीत केलेली आहेत. अशा, 52 गावांमध्ये आतापर्यंत कोणताच लाभ सामाजिक दायीत्व (सीएसआर) च्या माध्यमातुन मिळालेला नाही. या गांवाना सीएसआरच्या निधीतुन पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला.

प्रकल्प ग्रस्तांनाचा प्रश्न निकाली
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवून, त्यांच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे ऊर्जा विभागातील विविध ठिकाणी असणा-या रीक्त जागेंवर सामावुन घेण्या संदर्भात निर्णय आज घेण्यात आला.

Ahir and Chandrashekhar Bawankule
घाटंजी येथे बायोमास प्रकल्प
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे बायोमास प्रकल्प उभारण्याकरिता लवकरच शासकीय स्तरावरील प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील वीज निर्मिती प्रकल्पाच्या ठीकाणी होणारी चोरी थांबविण्यसाठी अत्याधुनिक निगरानी तंत्रज्ञान बसविण्याबाबत मंजुरी देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्येच कोळसा वॉशरी प्रकल्प उभारण्यात येईल. यामुळे वाहतुकीवरील खर्चामध्ये बचत होईल.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.