Published On : Mon, Oct 26th, 2020

आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड, तीन अटकेत – १३,३८,५९८/- चा मुद्देमाल जप्त

नागपुर: सध्या दुबई शहरात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचे क्रिकेट सामने सुरू असून, त्यातच आयपीएल वर जुगार खेळण्याचे वाढते प्रमाण पाहता, दिनांक २४/१०/२०२० रोजी केकेआर विरुद् डीसी यांचा सामन दुपारी खेळला जात असता स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पथकास मिळलेल्या गुप्त माहिती अनुषंगाने कोंढाळी अंतर्गत म्हसाळा शिवारातील गुलमोहर फार्महाऊस येथील एक कॉटेज मध्ये काही इसम क्रिकेट मॅचवर हारजीतचा जुगार खेळत असल्याबाबत प्राप्त माहितीच्या शहानिशा करून खात्री झाल्याने तेथे रेड करण्यात आली.

रेड दरम्यान आरोपी नामे १) दिनेश ताराचंद बनसोड, वय ५२ वर्ष रा. धम्मकिर्ती नगर अमरावती रोड वाडी नागपुर २) अमोल शंकरराव नाडीमवर, वय ४० वर्ष, गजानन नगर वाठोडा नागपूर असे केकेआर विरुद्ध डीसी यांच्या सुरू असलेले क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून नगदी ८,७७०/- ₹ तसेच ८ मोबाईल, १ चारचाकी वाहन, एलईडी टीव्ही व इतर साहित्य असून एकूण १३,३८,५९८/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस स्टेशन कोंढाळी येथे सादर दोन्ही आरोपींना व फार्म हाऊस मालक व मॅनेजर प्रवीण बंडूजी वाकोडे रा. देशमुख लेआऊट कोंढाली यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून, पुढील तपास पोलीस स्टेशन कोंढाळी करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार सहा.पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सपोउपनि जय शर्मा, मायकल डेनिअल, पोलीस हवालदार पंधरे, गजेंद्र चौधरी, महेश जाधव,अविनाश राऊत, सनोडिया,डोंगरे, पोलीस नाईक सुरेश गाते, पोलीस शिपाई रोहन डाखोरे,महेश बिसेन,बालाजी, महिला कॉन्स्टेबल नम्रता बघेल आणि चालक पोलीस हवालदार भाऊराव खंडाते सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांच्या पथकाने तसेच पोलीस स्टेशन कोंढाळीचे ठाणेदार गव्हाणे यांच्या स्टाफ अन्वये संयुक्तीकरित्या पार पाडण्यात आली

दिनेश दमाहे ( 9370868686 )