Published On : Fri, May 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये हॉटेल व्यवसायात १८०० कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगार

Advertisement

नागपूर – उपराजधानी नागपूरमध्ये हॉटेल उद्योगात तब्बल १८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, येत्या तीन वर्षांत देशातील प्रमुख हॉटेल ब्रँड्स नागपूरमध्ये आपले पाय रोवणार आहेत. या विस्तारामुळे नागपूरच्या हॉटेल व टुरिझम क्षेत्राला मोठा बूस्ट मिळणार आहे.

बर्डीमध्ये ‘ताज’ हॉटेलचे मोठे प्रकल्प
बर्डी भागात मेट्रो इंटरचेंजजवळ ताज हॉटेलचा मोठा प्रकल्प उभा राहणार आहे. कुकरेजा ग्रुपने पटवर्धन मैदान मेट्रोच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर घेतले असून, येथे ३०० खोल्यांचे ‘ताज’ हॉटेल प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

सिव्हिल लाईन्समध्ये नवीन प्रकल्प
सिव्हिल लाईन्स परिसरात हॉटेल्सची कमतरता लक्षात घेता फेअर व्हॅल्यू हॉस्पिटॅलिटीकडून ७५ कोटींच्या गुंतवणुकीतून १५० खोल्यांचे हॉटेल उभारण्यात येत आहे. याशिवाय कोराडी रोडवर त्यांची आणखी एक युनिट प्रस्तावित आहे. रेणु ग्रुपदेखील सिव्हिल लाईन्समध्ये १५० खोल्यांचे ‘बालवीर इन’ हॉटेल उभारणार आहे.

औद्योगिक गुंतवणूकाही वाढीच्या मार्गावर-

Advertisement

हॉटेल्स व्यतिरिक्त नागपूरमध्ये सुमारे २ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरच्या एकूण आर्थिक विकासात हॉटेल उद्योगाचे महत्त्वाचे योगदान असणार आहे.

रोजगाराला बळकटी-
या सर्व प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर हजारो रोजगार संधी निर्माण होतील. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने नागरिकांना याचा लाभ मिळेल.ही नागपूरसाठी सुवर्णसंधी मानली जात असून, शहराच्या आर्थिक व पर्यटन विकासात यामुळे लक्षणीय वाढ होणार आहे.

प्रमुख गुंतवणूक प्रकल्प (हॉटेल्स):

बर्डी परिसरात सुमारे ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हॉटेल ताज उभारले जाणार आहे. जयप्रकाश नगरमध्ये ‘ताज गेट’ हॉटेल येणार असले तरी गुंतवणुकीची रक्कम स्पष्ट नाही. चंद्रपूर रोडवर हयात हॉटेलसाठी ३०० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. विमानतळ परिसरात हिल्टन हॉटेल उभारण्यासाठी १७५ कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. आठरस्ता परिसरात अशोका हॉटेलसाठी २०० कोटींची तर मिहानमध्ये अपुलांझा आणि तुली हॉटेल्ससाठी प्रत्येकी ७५ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

सिव्हिल लाईन्समध्ये फेअर व्हॅल्यू हॉस्पिटॅलिटी ८० कोटींच्या प्रकल्पावर काम करत आहे, तर झिंगाबाई टाकळी येथे त्यांचाच दुसरा प्रकल्प १३० कोटींचा असणार आहे. बालवीर इन या हॉटेलचा प्रकल्पही सिव्हिल लाईन्समध्ये ८० कोटी रुपये गुंतवून उभारला जात आहे. वर्धा रोडवर ‘एक्सप्रेस’ हॉटेलसाठी अंदाजे १२५ ते १५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.