Published On : Sun, Nov 10th, 2019

रामजन्मभूमी च्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात कामठीत जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त

अयोध्याच्या रामजन्मभूमी निकालासंदर्भात कामठी ने दिला कौमी एकतेचा संदेश

कामठी :-सन 1855 पासून प्रलंबित असलेला अयोध्या येथील रामजन्मभूमी च्या वादग्रस्त जागेचा निकाल आज 9 नोव्हेंबर ला 455 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. या निकालानंतर शहरात फक्त निकालाचा चर्चेचा विषय ठरला मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा सर्वानुमते मान करीत शहरात शांतता बाधित ठेवीत शहरातील नागरिकांनी कौमी एकतेचा संदेश दिला.

या निकालातून कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत यासाठी पोलीस विभागाकडुन विशेष पोलीस नजरकैद बंदोबस्त करण्यात आला असून राज्य राखिव दल आणि केंद्रीय राखिव पोलीस दलाच्या तुकड्या दाखल झाल्या होत्या.

दरम्यान अयोध्येतील वादग्रस्त निकालाच्या निकालानंतर शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली तसेच धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असून सोशल मिडियावरील विविध व्हास्टसएप व फेसबुक वर विशेष लक्ष केंद्रित करून होते। अयोध्येतील वादग्रस्त जागेवर निकालासंदर्भात शहरात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलिसानी खबरदारीचे उपाय म्हणून डीसीपी निलोत्पल यांनी मुस्लिम धर्मगुरुसोबत बैठक घेऊन शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत करण्याचे आव्हान केले होते.या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मान कायम राखला.

आज 9 तारखेला लागणाऱ्या अयोध्या वादग्रस्त रामजन्मभूमी च्या निकालाच्या पाश्वरभूमीवर पोलीस उपायुक्त निलोत्पल तसेच एसीपी राजरतन बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, दुययम पोलिस निरीक्षक पाल, दुययम पोलीस निरीक्षक परदेसी यांच्या मुख्य उपस्थितीत शहरातील विविध मोक्याच्या ठिकानासह मुख्य मस्जिद सह मंदिर समोर विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

संदीप कांबळे