Published On : Wed, Jul 10th, 2019

‘दिलखुलास’ मध्ये ‘मूल्यवर्धन शिक्षण’या विषयावर मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मूल्यवर्धन शिक्षण’ या विषयावर शांतीलाल मुथा फाउंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(एमएसीआरटी) पुणे येथील डॉ. इरफान इनामदार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. ११,शुक्रवार दि.१२ शनिवार दि.१३ आणि सोमवार दि १५ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुल्यवर्धन कार्यक्रम नेमका काय आहे, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तसेच विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,शिक्षकांचा या कार्यक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद, मूल्यवर्धन कार्यक्रमाच मूल्यमापन कसं केलं जातं आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. मुथा आणि श्री. इनामदार यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.