Published On : Thu, Jul 15th, 2021

बँकेच्या पावतीवरून आंतरराज्यीय टोळीचा शोध

-दिल्लीतील तस्कर नागपूर पोलिसांच्या जाळयात

नागपूर– तस्कराने बँकेत खाते उघडले. त्याची पावती मात्र, गांजा असलेल्या बॅगमध्येच तो विसरला. या पावतीवरून पोलिस बँकेत पोहोचले. दिल्लीत जावून गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. ही महत्वपूर्ण कामगिरी लोहमार्ग पोलिसांनी केली. रणजित qसह (३३), गुरूदेव qसह (३२) आणि जसqवदर qसह (३६) अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

Advertisement

०२८५१ विशाखापट्टनम निजामुद्दीन एक्सप्रेस च्या कोच एस-२ बर्थ क्रमांक ६५ ते ७१ च्या खाली एक बेवारस बॅग बèयाच वेळ पासून होती. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच या बर्थवरून प्रवास करणाèया महिलेने बेवारस बॅग संदर्भात माहिती आरपीएफला दिली. आरपीएफच्या पथकाने दोन्ही बॅग तपासल्या असत्या त्यात १२ किलो ७४७ ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणी आरपीएफने कायदेशिर कारवाई करून पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Advertisement

दरम्यान गांजा असलेल्या बॅगवर एक टॅग लावले होते. टॅगमध्ये आरोपीचा पत्ता होता. तसेच बॅगमध्ये एक पावती आढळली. ही पावती दिल्लीतील निहाल विहार येथे बँक खाते उघडण्याची होती. यावरून आरोपीचे खाते दिल्लीतील बँकेत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान लोहमार्ग पोलिस सचिन ठोंबरे यांनी गाडीच्या नंबरवरून एस-२ डब्यातील प्रवाशांची यादी काढली. यादीतील पीएनआर वरून दोन तीन पीएनआर सिलेक्ट करून आरोपींची दिशा निश्चित झाली.

पोलिसांचे पथक दिल्लीला पोहोचले. निहाल विहार येथील बँक व्यवस्थापकाची भेट घेतली. या बँकेत अलिकडेच रणजितने खाते उघडले आहे. मात्र, पास बुक अन् एटीएम तो घेवून गेला नाही. असे बँक व्यवस्थापकाने पोलिस पथकाला सांगितले. तसेच पोलिसांच्या विनंतीवरून बँक व्यवस्थापकाने रणजितला फोन करून पासबुक आणि एमटीएम घेवून जाण्यास सांगितले. रणजित बँकेत येताच दबा धरून बसलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या मदतीने त्याच्या अन्य साथीदारांनाही ताब्यात घेतले. अशा पध्दतीने तिघांनाही अटक करून नागपुरात आणले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिस शिपाई रोशन मोगरे, सचिन ठोंबरे, प्रवीण खवसे, चंद्रशेखर मदणकर, योगेश घुरडे, मुकेश नरूले यांनी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement