Published On : Fri, Oct 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

दुबईत महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला इंटरपोलने घेतले ताब्यात; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Advertisement

नागपूर : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटिंग ॲपचा मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने ताब्यात घेतले असून, त्यानंतर त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अंमलबजावणी संचालनालय (ED) टीम महादेव ॲपचे मालक सौरभ चंद्राकरला एका आठवड्याच्या आत भारतात आणू शकते.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इंटरपोलने नोडल एजन्सी असलेल्या सीबीआयला याची माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याचे डी कंपनीशी (दाऊद इब्राहिम) संबंध आहेत. महादेव ॲपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या ॲपबाबत ईडीमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

महादेव बेटिंग ॲपवर केंद्राने घातली बंदी –
5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा ईडीने ‘कॅश कुरिअर’चे ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याचा दावा केला ज्याने उघड केले की छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई-आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 कोटी रुपये घेतले होते घेतले होते. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.

ईडीने 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा केला दाखल-
8 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळल्याचा आरोप होता. या प्रकरणी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह ३० हून अधिक जणांवर माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, जो नंतर मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आणि नंतर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. वास्तविक, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये ॲप आणि त्याचे प्रवर्तकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास सांगितले होते. सौरभ, रवी आदींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एफआयआरनुसार, आरोपींनी लोकांची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement