Published On : Fri, Jun 19th, 2020

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे;पुणे व्यापाऱ्यांची शरद पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी…

पूना मर्चंट्स चेंबर्सचे शिष्टमंडळ, वालचंद संचेती, पुणे व्यापारी महासंघ आणि फतेचंद रांका यांनी घेतली शरद पवारांची भेट…

Advertisement

मुंबई – पूना मर्चंट्स चेंबर्सच्या शिष्टमंडळासह वालचंद संचेती तसेच पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळासह फतेचंद रांका यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींसंदर्भातील निवेदन दिले.

Advertisement

पुणे व्यापारी महासंघात ८२ संघटना अंतर्भूत असून पुणे शहरातील २५ हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा यात समावश आहे. महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींची माहिती देऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.

Advertisement

घाऊक बाजारपेठेसाठी पुणे शहरात शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री प्रदशर्नांचे पुण्यात आयोजन करण्यासाठी सरकारने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे अशा विविध मागण्या शरद पवार यांच्याकडे मांडल्या.

१०० हून अधिक कर्मचारी काम करत असलेल्या संघटनांनाही केंद्र सरकारने पीएफची सुविधा द्यावी, छोट्या व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, व्यापाऱ्यांना निवृत्तीनंतर लाभदायी ठरेल अशी आयुषमान भारतसारखी योजना केंद्राने सुरू करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

किरकोळ आणि घाऊक बाजारातील समस्या अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी तसेच काही नवीन योजना बनवताना सरकारी समितीत पुणे व्यापारी महासंघाच्या किमान एका सदस्याचा समावेश असावा अशीही विनंती शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

पुणे व्यापारी महासंघाच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेऊन, सरकारपर्यंत या समस्या पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना दिले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement