Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 1st, 2018

  मनपा-OCW यांचे गिट्टीखदान चौक व अचरज टावर्स समोर आंतरजोडणीचे काम २ जानेवारी रोजी

  File Pic

  नागपूर: मनपा-OCW यांनी गोरेवाडा मुख्य वाहिनीवर (४५०मिमीx४५०मिमी व्यास) गिट्टीखदान चौक येथे २ जानेवारी २०१८ रोजी आंतरजोडणीचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे.

  या २४ तासांच्या आंतरजोडणीच्या कामातून गिट्टीखदान-काटोल रोड येथे नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. हे काम २ जानेवारी सकाळी ८ वाजता सुरु होईल व ३ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ८ वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे.

  या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे:

  धरमपेठ झोन मानवता नगर, गवळीपुरा, पंचशील नगर, आझाद नगर, मच्छी मार्केट (गिट्टीखदान चौक)

  दरम्यान, नागपूर महानगरपालिकेने अचरज टावर्स समोर एक आंतरजोडणी करण्याचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. या कामासाठी सकाळी ९ ते रात्री ९ एवढा कालावधी लागेल.

  याकामामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:

  मंगळवारी झोन: पोलीस लाईन टाकळी, राज नगर, विजय नगर, छावणी, NADT परिसर, मेकोसाबाग, न्यू कॉलनी, बैरामजी टाऊन व ख्रिश्चन कॉलनी.

  यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145