
File Pic
नागपूर: मनपा-OCW यांनी गोरेवाडा मुख्य वाहिनीवर (४५०मिमीx४५०मिमी व्यास) गिट्टीखदान चौक येथे २ जानेवारी २०१८ रोजी आंतरजोडणीचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे.
या २४ तासांच्या आंतरजोडणीच्या कामातून गिट्टीखदान-काटोल रोड येथे नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. हे काम २ जानेवारी सकाळी ८ वाजता सुरु होईल व ३ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ८ वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग खालीलप्रमाणे:
धरमपेठ झोन मानवता नगर, गवळीपुरा, पंचशील नगर, आझाद नगर, मच्छी मार्केट (गिट्टीखदान चौक)
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेने अचरज टावर्स समोर एक आंतरजोडणी करण्याचे काम हाती घेण्याचे ठरवले आहे. या कामासाठी सकाळी ९ ते रात्री ९ एवढा कालावधी लागेल.
याकामामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
मंगळवारी झोन: पोलीस लाईन टाकळी, राज नगर, विजय नगर, छावणी, NADT परिसर, मेकोसाबाग, न्यू कॉलनी, बैरामजी टाऊन व ख्रिश्चन कॉलनी.
यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
छात्र आंदोलन को राजनीतिक रंग देना दुर्भाग्यपूर्ण #ChandrashekharBawankule #MaharashtraNews #protest
दिल्ली आंदोलन के बाद नागपुर युवक का बड़ा दावा! #nagpurnews #StudentProtest #connaughtplacedelhi
अमरावती में आंबेडकरी संगठनों का विशाल मार्च #vidarbhanews #amravati #vidarbha #newsupdate
अमरावती में कांग्रेस का जोरदार विरोध प्रदर्शन #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtranews
छात्रों का मुद्दा उठते ही भावुक हुए अन्ना हजारे! #AnnaHazare #Maharashtra #Protest...
नागपुर में एंटी नारकोटिक्स टीम का बड़ा एक्शन! #NagpurNews #MDDrugs #AntiNarcotics #CrimeNews




