Published On : Thu, Sep 16th, 2021

ना. गडकरींनी केले दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे निरीक्षण

नाागपूर: केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाचे निरीक्षण केले. दोन दिवस या महामार्गाच्या कामाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. आज निरीक्षणाचा पहिला टप्पा होता.

आज हरयाणातील सोहना मे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय राज्यमंत्री श्री. राव इंद्रजितसिंहही यावेळी ना. गडकरी यांच्या सोबत होते. हरियाणा राज्यातून 160 किमीचा रोड जात आहे.

यापैकी 130 किमी रस्त्याच्या कामाचे अवॉर्ड झाले असून हरयाणाला राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला या रस्त्याने जोडले जाणार आहे. यामुळे चारही राज्यांमध्ये आर्थिक समृध्दी व विकासाचे दरवाजे खुले होणार आहेत.


दौसा- राजस्थान येेथे निरीक्षण

दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दोन दिवसीय निरीक्षण कार्यक्रमात आज पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसर्‍या टप्प्यात राजस्थानातील दौसा येथे या महामार्गाच्या कामाचे निरीक्षण केले.

त्यांच्यासोबत यावेळी राजस्थान सरकारचे मंत्री डॉ. बी. डी. कल्ला, दौसाच्या खासदार श्रीमती जसकौर मीणा आणि खा. किरोडी लाल मीणा सोबत होते.