Published On : Sat, Jul 13th, 2019

महावितरणतर्फ़े सुरु असलेली कामे जुलै अखेरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश

Advertisement

नागपूर: नागपूर जिल्ह्यात महावितरणतर्फ़े प्रगतीपथावर असलेली विकास कामे येत्या जुलै अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी सर्व संबंधित कंत्राटदार आणि अधिका-यांना दिले आहेत.

महावितरणतर्फ़े नागपूर जिल्ह्यात विविध योजनांमधून तब्बल 644 कोटींची विकासकामे सुरु असून या कामांच्या प्रगतीची आढावा बैठक नागपूर येथील विद्युत भवन येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी भालचंद्र खंडाईत यांनी सदर निर्देश दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक कामांचा एजन्सीनिहाय सविस्तर आढावा घेत काही तांत्रीक कारणांमुळे रखडलेली कामे जलदगतीने पुर्ण करण्यासाठी योग्य तोडगाही त्यांनी सर्व संबंधितंना सुचविला. यावेळी संचालक (प्रकल्प) यांनी कामाच्या गुणवत्तेशी कुठलीही तडजोड खपवून घेतल्या जाणार नसल्याची सक्त ताकीदही संबंधितांना दिली.

Gold Rate
01 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,29,300 /-
Gold 22 KT ₹ 1,20,200 /-
Silver/Kg ₹ 1,75,800/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


तत्पुर्वी भालचंद्र खंडाईत यांनी राष्ट्रीय महामागार्गावरील महावितरणतर्फ़े सुरु असलेल्या वीजखांब हटविण्याच्या कामांना भेट देत तेथील कामांची पाहणी करीत काम जलदगतीने पुर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना व अधिका-यांना दिल्या याशिवाय कामठी येथे सुरु असलेल्या विकास कामांचीही त्यांनी पाहणी केली, यावेळी त्यांच्यासमवेत नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता उमेश शहारे, नारायण आमझरे, दिलीप दोडके यांचेसह कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement