नागपूर : राज्याची उपराजधनी असलेल्या नागपुरात डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजराने थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजारामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरणच परसले असून प्रशासनाने ‘हर घर तिरंगा’मोहिमे सोबतच ‘हर घर फवारणी’ची ही मोहिमही राबवावी, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली.
भारतात १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी’मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या ११२ व्या आवृत्तीत हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र मोदी सरकारच्या या मोहिमेसोबतच काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी ‘हर घर फवारणी’ची मागणी केली आहे.
नागपुरात ‘हर घर तिरंगा’ सोबतच ‘हर घर फवारणी’ची गरज-
राज्याच्या उपराजधानीत सध्या डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरात डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. या जीवघेण्या आजरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘हर घर फवारणी’ची गरज असल्याचेही ते म्हणाले.
महापालिकेकडून संशयितांची तपासणी अल्प- महापालिकेकडून संशयितांची तपासणी अल्प होत असल्याने रुग्ण मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांत रुग्ण धाव घेत आहेत. या रुग्णांच्या तपासणीचे आकडे समोर येत नसल्याची चर्चा सुरु आहे.
दरम्यान मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयातील साथ रुग्णांमध्ये गेल्या महिनाभरात दीडपट वाढ झाली आहे. ७० टक्के रुग्णांमध्ये चिकनगुनिया आणि डेंगीची लक्षणे आढळली आहेत. हे रुग्ण संशयित असून उपचारानंतर ते बरे होत आहेत. या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, चढ-उतार ताप, गॅस्ट्रो आदी आजराने ग्रस्त आहेत.