Published On : Sat, Jun 29th, 2019

नामप्रविप्रा महानगर आयुक्त यांनी केली विविध प्रकल्पांची पाहणी

तातडीने कार्य पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना दिले निर्देश

नागपूर : शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या निर्माणाधीन प्रकल्पांचा आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज शुक्रवार, दिनांक २८ जून रोजी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्रीमती शीतल तेली-उगले यांनी विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्यानिमित्य नामप्राविप्र’चे अप्पर आयुक्त श्री. हेमंत पवार, नामप्रविप्रा’चे अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्याय कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री. प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद देवरस उपस्थित होते.

Advertisement

सर्वप्रथम कामठी रोडवरील इंदोरा परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे तयार करण्यात येत असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर’ची पाहणी करून याचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत कामठी रोडवर नासुप्रच्या ७५०० चौरस मीटर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. यापैकी ४ हजार चौरस मीटर जागेवर सेंटरचे बांधकाम होत आहे. ५ मजलीच्या कन्व्हेंशन सेंटर मध्ये ४० फूट उंचीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा स्थापित करण्यात येणार आहे.

Advertisement

तसेच याठिकाणी व्यावसायीक सेंटर व रिसेप्शन हॉल (क्षमता- १२५ लोकांकरीता), मिडिया सेंटर(क्षमता- ३० लोकांकरीता), डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन ऑफिस(क्षमता- ३० लोकांकरीता), रेस्टोरेंट(क्षमता- १०० लोकांकरीता), सार्वजनिक अभ्यासिका केंद्र(क्षमता- १२५ लोकांकरीता), बुद्धिस्ट अभ्यासिका केंद्र(क्षमता- ३० लोकांकरीता), संशोधन केंद्र(क्षमता- ३० लोकांकरीता), संग्रहालय व आर्ट ग्यालरी(क्षमता- ४०० लोकांकरीता), ऑडीटोरियम (क्षमता- १०० लोकांकरीता), गेस्ट रूम(क्षमता- १० लोकांकरीता), प्रशिक्षण केंद्र(क्षमता- १०० लोकांकरीता), स्टोर रूम,नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था तयार करण्यात येत आहे.

मौजा चिखली(देवस्थान) येथे नासुप्र’च्या जागेवर पूर्व नागपूरचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय तयार करण्यात येत आहे. १८०५९ चौ.मी. क्षेत्रफळात ६७१५ चौ.मी. जागेवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारले जात आहे. प्रादेशिक कार्यालयाशी संबंधित संपूर्ण कार्य याठिकानी प्रस्तावित आहे. लकडगंज स्थित पोलीस स्टेशन परिसरात नवे पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३४ निवासी गाळ्यांच्या प्रकल्प उभारण्यात येत आहे. १९३६५ चौ.मी. इतक्या जागेवर हा प्रकल्प साकारल्या जात आहे. याठिकांनी पोलीस स्टेशन जी+३, डीसीपी/एसीपी ऑफिस जी+१, कमर्शियल कॉम्प्लेक्स/युटिलिटी शॉप जी+२, पीआय अँड पीएसआय निवासी गाळे जी+१२ (प्रत्येकी ५० चौ.मी.चे ४८ घरकुले), कॉन्स्टेबल निवासी गाळे जी+११ (प्रत्येकी ४४ चौ.मी.चे ३०० घरकुले) प्रस्तावित आहेत.

उल्लेखनीय आहे कि, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कार्य आगामी १५ ऑगस्ट पर्यंत व लकडगंज स्थित नवे पोलीस स्टेशन’चे कार्य ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश श्रीमती शीतल तेली-उगले यांनी कंत्राटदारांना दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खसरा क्रमांक १२/१-२, मौजा वांजरी येथे निर्माणाधीन घरकुलांची पाहणी केली. एकूण १६ इमारती पैकी १३ इमारतीचे कार्य प्रगतीपथावर आहे. एकूण 765 घरकुले येथे तयार करण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तरोडी (खुर्द) अंतर्गत खसरा क्रमांक ६३ मध्ये तब्बल २३७४ घरकुले व खसरा क्रमांक ६२ मध्ये ९४२ घरकुले निर्माणाधीन आहेत. निर्माणाधीन घरकुलांसाठी रस्ते, सीवर लाईन, सुरक्षा भिंती, पार्किंग आणि सोलर पॅनलची सुविधा गाळे धारकांसाठी करण्यात येत आहे. ४ किमी इतक्या लांबीचे अंतर मोजावे लागणार नाही व गाळे धारकांना प्रकल्पापासून ५ मिनिटात शहरातील रिंगरोड पर्यंत पोहोचता येईल यासाठी तयार करण्यात येत असलेल्या २४ मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास आहे. २५० मीटरचा लिंक रस्ता तयार पूर्णत्वास असल्याने या कार्याची प्रशंसा त्यांनी केली.

दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या घरकुलांची सोडत जुलै किंवा ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता असल्याने डिसेंबर पर्यंत घरकुलांचे कार्य पूर्ण करण्यात यावे, असे आदेश सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement