Published On : Sat, May 1st, 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त कोविड केअर सेंटर चा अभिनव उपक्रम

नागपुर – जट्टेवार सभागृह नंदनवन रोड येथे सुरु असलेल्या 60 बेड च्या कोविड केअर सेंटर द्वारे उद्या दिनांक 1 मे 2021 पासून १८ ते ३५ वयोगटातील कोरोना बाधित तरुण रुग्णांना मोफत सुविधा जश्या बेड, उत्तम सुश्रुषा, डाएट नुसार नाश्ता व दोन वेळचे जेवण इत्यादी देण्यात येईल असे सेन्टर चे संचालक श्री.अक्षय हेटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने उद्यापासून 18 ते 45 वयोगटातील तरुणांना मोफत लसीकरण या अभूतपूर्व निर्णयाला अनुसरून उद्या पासून आम्ही सुद्धा तरुणांना मोफत उपचार मिळावा याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.नागपूर मधील एकही युवक पैश्याच्या अभावामुळे उपचारापासून वंचित राहिला नाही पाहिजे हेच आमचे धोरण असल्याचे डॉक्टर आशिष चिखले व अक्षय हेटे यांनी यावेळी सांगितले.


या वयोगटातील रुग्णांना बाहेरून घ्याव्या लागणाऱ्या सेवा जसे पॅथॉलॉजी, सी.टी. स्कॅन इत्यादी स्वखर्चाने कराव्या लागतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.कोविड केअर सेंटर मध्ये डॉ.आशिष चिखले, डॉ.पंकज माचवे, डॉ.अनुराग रहाटे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सोबत एकूण 12 डॉक्टर व 65 लोकांचा स्टाफ सेवा देत आहेत.आतापर्यंत शासन मान्य दराने एकूण 84 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून सध्या सेंटर ला 23 रुग्ण भरती आहेत.

१८ ते ३५ वयोगटातील तरुण कोरोना बाधित युवक व युवती रुग्णांनी जत्तेवार सभागृह येथील कोव्हिड केअर सेन्टर मध्ये भरती होण्याकरिता (8669645294 / 8665645295) या नंबर वर संपर्क साधावा.