Published On : Thu, May 14th, 2020

जिल्ह्यातील ११ लाख वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती

Advertisement

शिल्लक वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे महावितरणचे आवाहन

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा निशुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकानी अद्यापही महावितरणकडे अजूनही आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे न केल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी महावितरणकडून दिले जाणारे संदेश या वीज ग्राहकापर्यंत पोहचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज ग्राहकांनी आपली माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन अद्यावत करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून देण्यात आल्या माहितीनुसार, नागपूर शहारत ७ लाख ८१ हजार ५९१ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची माहिती महावितरणकडे दिली असून नागपूर ग्रामीण भागात ३ लाख ६६ हजार ००६ ग्राहकांनी आपले मोबाइलला क्रमांक महावितरणला दिले आहेत.

विजेवर आपली दिवसातील बरीचशी कामे अवलंबून असल्याने वीज पुरवठा जर अचानक बंद झाला तर आपलं वेळेचं नियोजन चुकू शकते आणि कामे ठप्प पडू शकतात.हे नियोजन चुकू नये म्हणून ग्राहकाला वीज पुरवठा बंद होण्याआधी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवला जातो ज्यामध्ये आपला वीज पुरवठा कधी बंद राहील याची पूर्वसूचना दिली जाते. कदाचित वीज ग्राहकाने चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदवला असल्याने त्याच्या पर्यंत हि माहिती पोहचववण्यास महावितरण अडचण होत आहे.

महावितरणकडे वीज ग्राहकाचा मोबाईल क्रमांक नोंदणी असल्यास अकस्मात वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण, वीज ग्राहकाच्या घरी मीटर वाचन करण्यास मीटर रीडर कधी आणि किती वाजता येणार याची माहिती, वीज ग्राहकाने विशिष्ट कालावधीत किती युनिटचा वापर केला, किती रुपयांचे देयक भरले आहे याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून वीज ग्राहकास दिल्या जाते. वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक, आधार कार्ड नंबर आणि ई-मेल नोंदणीसाठी https://consumerinfo.mahadiscom.in येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीज ग्राहकांनी आपला वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या १८००२३३३४३५ येथे ,तसेच राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक १९१२ येथे संपर्क साधावा. वरील सर्व क्रमांक टोल फ्री असल्याने यासाठी वीज ग्राहकाला पैसे मोजावे लागत नाहीत. सोबतच महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी नुकतीच “मिस्ड कॉल” सेवा सुरु करण्यात आली आहे. महावितरणकडे नोंदणी असलेल्या मोबाईल क्रमांकावरून वीज ग्राहकाने ०२२- ४१०७८५०० येथे फोन करायचा आहे.